15 January 2025 6:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA
x

कोरोना आपत्ती: देशभरातील मोदी समर्थकांकडून केवळ उद्धव ठाकरे लक्ष

CM Uddhav Thackeray, Corona Crisis, Covid19, Kangana Ranaut sister Rangoli Chandel

मुंबई, ०९ एप्रिल: राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत ११७ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दुसरीकडे देशामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. अशात ओडिशा सरकारने लॉकडाऊनचा अवधी वाढवला आहे. २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन संपण्यापूर्वीच ओडिशा सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेण्यापूर्वीच ओडिशा सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारे ओडिशा देशातील पहिले राज्य आहे.

मात्र राज्यातील भाजपाचे नेते मंडळी आणि देशभरातील मोदी समर्थक समाज माध्यमांवर केवळ उद्धव ठाकरे यांना लक्ष करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये मोदी समर्थक कलाकार देखील आघाडीवर आहेत. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगीजींकडून गंभीर धडा देण्याची गरज आहे,’ असे ट्विट रंगोलीने केले आणि तिचे हे ट्विट बघता बघता क्षणात व्हायरल झाले. रंगोली चंडेल ही कट्टर मोदी समर्थक कंगना रानौत हिची बहीण आहे.

हे ट्विट करताना तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कार्यांचा पाढाही वाचला. होय, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी करोना व्हायरसचा वाढता फैलाव पाहता हॉटेलमध्ये १०,००० खोल्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये देखील १०,००० खोल्या करोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार ठेवल्या आहेत, अशी योगींच्या कार्याची महती सांगणारी एका वेब पोर्टलची बातमी या ट्विटसोबत तिने जोडली आणि याच निमित्ताने उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

 

News English Summary: ‘The Chief Minister of Maharashtra needs a serious lesson from Yogis,’ tweeted Rangoli, and seeing this tweet went viral in a moment. Rangoli Chandel is the sister of hard line Modi supporter Kangana Ranut. While tweeting this, she also read about the actions of Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in the wake of the Corona crisis. Yes, Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has decided to set up an isolation ward in a hotel of 10,000 rooms in view of the increasing prevalence of the Corona virus. She also linked the news with a tweet from a web portal that informed about the work of Yogi, that 10000 rooms have been prepared for the treatment of coronary patients in the hospital as well and targeted Uddhav Thackeray for this purpose.

News English Title: Story Kangana Ranaut sister Rangoli Chandel criticized Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Corona Crisis Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x