24 January 2025 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर पुन्हा बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला - NSE: IRFC Nippon India Growth Fund | पगारदारांनो, श्रीमंत करतेय या फंडाची योजना, 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 4 कोटी रुपये परतावा मिळेल Salary Account | बँकेत चक्कर न मारता सॅलरी अकाउंट बनेल पेन्शन अकाउंट, मिळतील अनेक फायदे, नोट करून ठेवा NTPC Share Price | एनटीपीसी शेअरवर ब्रोकरेज बुलिश, 36 टक्के तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत मोठे संकेत, ब्रोकरेज फर्मने दिला महत्वाचा सल्ला - NSE: TATATECH EPFO Pension Money | आता सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना महिना 7,500 रुपये पेन्शन मिळणार, मोठ्या फायद्याची अपडेट आली Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
x

लॉकडाउन: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींच्या मुलाचे लग्न थाटामाटत

Covid19, Corona Crisis, Lockdown, HD Kumarswamy son wedding

बंगळुरू, १७ एप्रिल: भारतामध्ये कोरोना विषाणूचा वेग हळूहळू मंदावत चालला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कमी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर १७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी २२ जणांचा मृत्यू झाला होता. अशात शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे.

देशभरातल्या ३२५ जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झालेला नाही अशी माहिती केंद्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे. देशाच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. काही वेळापूर्वी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेशी आमची चर्चा झाली असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं.

देशात अशी भयानक स्थिती आणि लॉकडाउन असताना दुसरीकडे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचे लग्न आज थाटामाटत पार पडले. या व्हीव्हीआयपी लग्न सोहळ्याला अनेकजणांनी उपस्थिती लावली होती. कर्नाटक सरकार यावर लक्ष ठेवणार आहे. संपूर्ण विवाह सोहळ्याचे व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येत आहे.

एचडी कुमारस्वामींचा मुलगा निखिल याचा लग्न सोहळा रामनगर जिल्ह्यातील एका फार्म हाऊसवर पार पाडण्यात आला. सरकारकडून २१ कारना येण्याजाण्याची परवानगी देण्यात आली आहे. कुमारस्वामींचे म्हणणे आहे की, त्यांनी राज्य सरकारकडून लग्नासाठी परवानगी घेतलेली आहे. तसेच कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. तर कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे की, संपूर्ण विवाह सोहळ्याचे चित्रिकरण करण्यात येणार आहे. यामध्ये जर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. तर कुमारस्वामी यांच्या दाव्यानुसार निखिलचे लग्न हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

News English Summary: On the other hand, the marriage of the son of former Karnataka Chief Minister HD Kumaraswamy had ended in a state of shock and lockdown. This VVIP wedding was attended by many. The Karnataka government is going to monitor this. Video of the entire wedding ceremony is being filmed.

News English Title: Story Karnataka Corona virus crisis HD Kumarswamy son Nikhil tied knot Revathi during lockdown Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x