15 January 2025 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

मध्य प्रदेश: कमलनाथांनी बोलावली मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

News Latest Updates, CM Kamal Nath

जयपूर, १५ मार्च:  मध्य प्रदेश विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता वाटत नाही. उलट भाजपच तणावात आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केले. मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला १६ तारखेला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशातील घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना खबरदारी म्हणून राज्याबाहेर हलवले होते. यापैकी काँग्रेसचे आमदार रविवारी हरिश रावत यांच्यासोबत भोपाळमध्ये परतले. त्यांनी म्हटले की, आम्ही उद्या सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी तयार आहोत. आम्हाला त्याची बिलकूल चिंता वाटत नाही. उलट भाजपच तणावात आहे, असे त्यांनी म्हटले.

दुसरीकडे, मध्य प्रदेशमध्ये भाजपला आत्मविश्वास जाणवत आहे. भाजपचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गोपाल भार्गव आणि डॉ. नरोत्तम मिश्र हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. विधानसभेत बहुमत चाचणी व्हावी अशी भाजपची आधीपासूनच मागणी आहे.

काँग्रेसच्या ८२ आमदारांना राजस्थानमध्ये हलविण्यात आले होते. त्यांना आज पुन्हा भोपाळमध्ये आणण्यात आले असून मॅरियॉट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या हॉटेलला पोलिसांसह कार्यकर्त्यांनीही वेढा घातला आहे. तर उद्या बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितल्याने मुख्यमंत्री कमलनाथांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. यानंतर ते आमदारांसोबत चर्चेसाठी हॉटेलवर जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी चर्चा करण्यासाठी ज्योतिरादित्य शिंदे पोहोचले आहेत. उद्या बहुमत चाचणीसाठी त्यांच्यात चर्चा होऊ शकते. गुरगावमध्ये मानेसरच्या एका रिसॉर्टमध्ये भाजपचे आमदारांना ठेवण्यात आले असून रविवारी भोपाळला आणले जाऊ शकते. तर बंगळुरु येथील शिंदे समर्थक आमदारांनाही उद्या विधानसभेचे कामकाज सुरु होण्याआधी भोपाळमध्ये आणले जाऊ शकते.

 

News English Summery: The Congress is fully prepared to face a credible resolution in the Madhya Pradesh Assembly. We do not feel any anxiety. On the contrary, senior BJP leader Harish Rawat has said that BJP is under stress. Madhya Pradesh Governor Lalji Tandon has directed the Kamal Nath government to hold a majority test on the 16th. Meanwhile, developments in Madhya Pradesh have gained momentum. Both the Congress and the BJP had moved their MLAs out of state as a precaution. Congress MLAs returned to Bhopal with Harish Rawat on Sunday. “We are ready to prove a majority in the House tomorrow,” he said. We’re not worried about that at all. On the contrary, BJP is under stress, he said. 82 Congress MLAs were shifted to Rajasthan. They have been brought back to Bhopal today and kept at the Marriott Hotel. The hotel is surrounded by policemen and activists. On the other hand, Chief Minister Kamal Nath has convened a cabinet meeting to ask him to prove the majority test tomorrow. After this, he is likely to visit the hotel for discussion with the MLAs.

 

News English Title: Story Madhya Pradesh political crisis urgent cabinet meeting convened by Chief Minister Kamal Nath News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x