25 November 2024 2:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

मध्य प्रदेशातील राजकारण तापलं; त्या आमदारांच्या भेटीला गेलेल्या दिग्विजय सिंहांना अटक

CM Kamal Nath, Madhya Pradesh, Congress

बंगळुरू, १८ मार्च: मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज पडदा पडेल का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बहुमत चाचणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असून दुसरीकडे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना बहुमत चाचणीला आज सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. तर बंडखोर आमदार बेंगळुरूला असताना बहुमत चाचणी घेणे हे घटनाविरोधी ठरेल असे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे म्हणणे आहे.

आज या सरकारची बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूत असलेल्या या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह तिथे पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

यावेळी दिग्विजय सिंह मध्य प्रदेशमधील राज्यसभेचा उमेदवार आहे. 26 तारखेला राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेत मतदान होणार आहे. आमच्या आमदारांना या हॉटेलमध्ये बंधक बनवण्यात आलं आहे. त्यांना आमच्याशी बोलायचे आहे, परंतु त्यांचे मोबाइल काढून घेण्यात आले. आमदारांचा जीव धोक्यात आहे. माझ्या हातात बॉम्ब नाही, पिस्तूल नाही आणि शस्त्रे नाहीत. तरीही पोलिस मला का रोखत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दिग्विजय सिंह यांच्यासोबत कांतीलाल भूरिया, आमदार आरिफ मसूद आणि कुणाल चौधरी हे देखील बंगळुरूला गेले आहेत. याठिकाणी कर्नाटकचे कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार त्यांना घेण्यासाठी आले होते.

 

News English Summery:  The political drama that has been going on in Madhya Pradesh for the past few days has caught the attention of the entire country. On the majority of the trials, a hearing is being held in the Supreme Court on the other hand. If the rebel MLA is in Bangalore, taking a majority test would be counter-incidental, Chief Minister Kamal Nath said. Today, the government is likely to get a majority test. On this backdrop, senior Congress leader Digvijay Singh reached there to meet the rebel MLAs in Bangalore. However, the police arrested them. Digvijay Singh is the Rajya Sabha candidate in Madhya Pradesh. Voting will be held in the Legislative Assembly for the Rajya Sabha elections on the 26th. Our MLAs are being held hostage in this hotel. They want to talk to us, but their mobile is taken away. The life of the MLA is in danger. I have no bombs, no pistols and no weapons in my hands. Why are the police still blocking me? He raised such a question. Digvijay Singh along with Kantilal Bhuria, MLA Arif Masood and Kunal Chaudhary have also traveled to Bengaluru. This is where Karnataka Congress President DK Shiv Kumar came to pick him up.

 

News English Title:  Story Madhya Pradesh political crisis will Kamal Nath government face floor test today live News Latest updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x