5 November 2024 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

गुजरातमध्ये भाजपची २० वर्ष सत्ता; पण आधुनिक शाळांसाठी मेलेनिया ट्रम्प दिल्लीला: सविस्तर वृत्त

Story Melania Trump, Visit Delhi happiness school at Delhi

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया यांच्याबरोबर दिल्लीतील सरकारी शाळांच्या दौऱ्यात आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सहभागी होणार नाहीत. केंद्र सरकारने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे नाव कार्यक्रमातून हटवल्याचा आरोप आपमधील सूत्रांनी केला होता.

नियोजित कार्यक्रमानुसार मेलेनिया ट्रम्प यांच्याबरोबर हे दोन्ही नेते दौऱ्यात सहभागी होते. परंतु, नाव हटवल्यानंतर या कार्यक्रमाशी आपला काही संबंध नसल्याचे सरकारने यापूर्वीच म्हटले आहे. उद्या म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी मेलेनिया दक्षिण दिल्लीतील सरकारी शाळेत हॅप्पीनेस क्लास पाहायला जाणार आहेत. ट्रम्प आणि मोदी यांची जेव्हा बैठक सुरु असेल. त्यावेळी मेलेनिया या शाळेत असतील. केजरीवाल सरकारने २०१८ मध्ये दिल्लीतील शाळांमध्ये हॅप्पीनेस क्लासची सुरुवात केली होती. हा क्लास नर्सरीते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मुलांना मानसिक तणावापासून दूर ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. हॅप्पीनेस क्लासच्या मदतीने मुलांच्या वर्तणुकीत सकारात्मक बदल दिसून आले आहेत.

मात्र एक गोष्ट लक्षात घेण्याची आहे आणि ती म्हणजे या दौर्यात सर्वाधिक गुजरात केंद्रस्थानी ठेवण्यात आलं. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाची १९९८ पासून सलग म्हणजे तब्बल २० वर्षाहून अधिक काळ सत्ता आहे. त्यात नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. मात्र आजही भाजप किंवा मोदींना छातीठोकपणे गुजरातमधील सरकारी शाळा दाखविण्याची हिम्मत झाली नसावी. तसेच जर अमेरिकन टीमने कोणत्या शाळेला भेट द्यावी याची छाननी केली असेल तर ते केजरीवाल सरकारचं यश म्हणायला हवं असं तज्ज्ञ मानतात. त्यामुळे भिंती घालून राज्यातील कोणकोणत्या गोष्टी मोदी लपवत राहणार ते भविष्यकाळच सिद्ध करेल.

 

 

News English Summery: The two leaders Arvind Kejriwal and Manish Sisodia were on a tour with Melania Trump as planned. However, the government has already said that you have nothing to do with the program after deletion. Tomorrow, February 3, Melania will be attending a Happiness class at a government school in South Delhi. When the meeting between Trump and Modi begins. Melania will be at the school then. The Kejriwal government had introduced Happiness classes in schools in Delhi in the 5th. This class is for nurses up to grade 8 students. The purpose of this is to keep children away from stress. With the help of the Happiness Class, children’s behavior has shown positive changes.

 

Web Title: Story Melania Trump, Visit Delhi happiness school at Delhi.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x