27 December 2024 2:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

जनजीवन सुरळीत करायचं असल्यास तो परिसर लष्कराच्या ताब्यात द्या: ओवेसी

MIM MP Asaduddin Owaisi, Modi government, Indian Army, North East Delhi Area

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन दिल्लीतील जाफराबाद येथील आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले आहे. या हिंसाचारात एकूण ७ जण मृत्युमुखी पडले आहेत. यात एक पोलीस आणि ६ नागरिकांचा समावेश आहे. तर ७५ हून अधिकजण जखमी झाले आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ४ मृतदेहांच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा आढळल्या आहेत, तर दगडफेकीत गंभीर इजा होऊन हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. दिलशाद गार्डनमधील गुरु तेग बहादूर रुग्णालयात हिसांचारातील जखमींवर उपचार सुरु आहेत. तर मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह येथील शवागृहात ठेवण्यात आले आहेत. आज हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

दरम्यान, या संपूर्ण घटनेवर ओवेसींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो साप पाळला आहे, तो त्यांना डसणार’ असं म्हणतं ओवेसींनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. हैद्राबादमध्ये सीएए-एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात एका बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘दिल्लीतील हा हिंसाचार एका माजी आमदारामुळे होत आहे. आता यामध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचेही पुरावे आता समोर आले आहेत. त्या माजी आमदारांना त्वरित अटक केली पाहिजे आणि लवकरात लवकर हिंसाचार थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असं न झाल्यास या हिंसाचाराची व्याप्ती वाढेल’ असं ओवेसींनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच नॉर्थ ईस्ट दिल्लीतील जनजीवन सुरळीत करायचं असल्यास तो परिसर लष्कराच्या ताब्यात द्या असं देखील त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

तत्पूर्वी मौजपूर भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतलेले असताना बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, त्याचे नाव शाहरुख असल्याचे समोर आले आहे. तो तेथील स्थानिक रहिवासी असल्याचेही सांगण्यात आले आहे. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. हा तरूण पोलिसांसमोर देखील गोळीबार करत होता. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनाही न जुमनता त्यांने बंदुकीद्वारे आठ गोळ्या झाडल्या. दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

तसेच जामिया समन्वय समितीनं पोलिस मुख्यालयाबाहेर दिल्लीतील हिंसाचाराविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाचा पवित्रा मागे घेत पोलिसांसमोर काही मागण्या ठेवल्या. कपिल मिश्रा यांनी त्यांच्या भाषणातून व ट्वीटच्या माध्यमातून दिल्लीतील इशान्य भागात हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

 

News English Summery: Meanwhile, Owaisi reacting to the whole incident, saying that the snake that Prime Minister Narendra Modi has followed will bite him, saying that Owaisi has left criticism on Modi. A meeting was organized in Hyderabad against CAA-NRC and NPR. They were talking at the time. ‘This violence in Delhi is caused by a former MLA. Evidence has now emerged that the police were involved in this. Those former MLAs should be arrested immediately and efforts should be made to stop the violence as soon as possible. Otherwise, the prevalence of violence will increase, “Owaisi said. An English website has reported this. He also tweeted that if the people of North East Delhi want to make life comfortable, they should hand over the area to the army.

 

Web Title: Story MIM MP Asaduddin Owaisi requested Modi government to give charge to Indian Army of North East Delhi Area.

हॅशटॅग्स

#MIM(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x