22 February 2025 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch
x

'U T' NRC - CAA, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा; आमदार राजू पाटील यांचा टोला

MNS MLA Raju Patil, CM Uddhav Thackeray

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यात सीएए, एनआरसी आणि एनपीआरबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आता महाविकास आघाडीत धुसफूस होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA चा अभ्यास करावा, असा सल्ला काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी दिला. त्याआधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही उद्धव ठाकरेंनी सीएएचं जाहीर समर्थन करु नये असं म्हटलं आहे.

याबाबत काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी ट्विट करुन म्हटलंय की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सीएए कायद्याबाबत नीट माहिती दिली पाहिजे. २००३ च्या कायद्यानुसार एनपीआर हा एनआरसीचा भाग आहे. त्यामुळे जर एकदा तुम्ही एनपीआर लागू केला तर एनआरसी रोखली जाऊ शकत नाही. तसेच सीएए कायद्याकडे भारतीय संविधानाच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे कारण धर्माच्या आधारे नागरिकत्व दिलं जाऊ शकत नाही असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेनेने लोकसभेत CAA NRC ला पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया देताच शिवसेनेने राज्यसभेत मात्र विरोध केला होता. याच सततच्या बदलत्या भूमिकेवरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. आमदार राजू पाटील यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, ‘गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा ! वेग-वेगळ्या संबंधांचेही,वेग-वेगळे ढगळे असतात; दाखवायचे दात वेगळे अन् खायचे दात वेगळे असतात. कधी विरोध करता-करता,कधी-कधी दुजोरा असतो; गल्लीत गोंधळ करता-करता,दिल्लीत मात्र मुजरा असतो !…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्यांबाबत चर्चा झाली. “सुधारित नागरिकता कायद्याला घाबरायची गरज नाही, राष्ट्रीय नागरिकता नोंदणी अर्थात एनआरसी पूर्ण देशात लागू होणार नाही. तर राष्ट्रीय जनगणना नोंदणी अर्थात एनपीआरबाबत देशाची जनगणना दर दहावर्षांनी होते. कायदा लागू झाल्यावर तो धोकादायक वाटला तर वाद होऊ शकतात. एनपीआरमध्ये काही आक्षेपार्य असेल तर आपण बोलू शकतो. काँग्रेससोबत सीएए आणि एनपीआरबाबत चर्चा सुरु आहे,”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

काल पंतप्रधानांसोबत बैठक संपताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तेथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवाद साधताना म्हणाले की, ‘पंतप्रधानांसोबत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली असून त्यात GST आणि इतर अनेक महत्वाचे विषय होते. मात्र राज्यात CAA अमलात येणार असला तरी त्याला घाबरण्याची अजिबात गरज नसून, हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, ना की कोणाचं नागरिकत्व हिरावून घेणारा कायदा असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आज काँग्रेसकडून ही प्रतिक्रिया आली आहे.

 

Web Title: Story MNS MLA Raju Patil criticizes CM Uddhav Thackeray over NRC CAA issue and Delhi Visit.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x