21 November 2024 11:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मोदीजी सरकार पाडण्यात तुम्ही व्यस्त, पण त्याचवेळी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले...

Rahul Gandhi, Narendra Modi

नवी दिल्ली: मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे राजीनाम्याचे पत्र समोर आले. ज्योतिरादित्य शिंदे बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मध्यप्रदेशात काँग्रेस सरकारवर आलेल्या ज्योतिरादित्य संकटामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अडचणीत आलं आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या २२ आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री कलनाथ यांच्याकडे राजीनामे सोपवले. यामुळे सरकार अल्पमतात आलं आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी ज्योतिरादित्य शिंदे यांचा राजीनामा मंजूर करताच त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली. यानंतर मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पण सरकार अल्पमतात आहे हे मान्य करायला कमलनाथ मात्र तयार नाहीत.

दरम्यान, मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सकाळी एक ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोमणा मारला. मध्य प्रदेशमधील लोकांनी निवडून दिलेले सरकार अस्थिर करण्यात पंतप्रधान व्यग्र असताना जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ३५ टक्क्यांनी घसरले आहेत. या घसरणीचा फायदा सामान्य लोकांना मिळवून द्या. पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा, अशी मागणी त्यांनी केली.

राहुल गांधी यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लोकांनी निवडून दिलेले सरकार पाडण्यात तुम्ही व्यग्र आहात. पण याचवेळी तुम्ही एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर ३५ टक्क्यांनी घसरले आहेत. याच घसरणीचा फायदा तुम्ही सामान्यांना देणार आहात का, पेट्रोल दर ६० रुपयांपर्यंत खाली आणणार आहात का, त्याचा अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास फायदाच होईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

 

News English Summery: In Madhya Pradesh, political dramatic developments have accelerated. The political upheaval that started yesterday is still visible today. After Jyotiraditya Shinde’s resignation, everyone is eager for Rahul Gandhi’s response. Former Congress President Rahul Gandhi has reacted to the backdrop of political developments in Madhya Pradesh after nearly two hours. Rahul Gandhi has targeted the Modi government through a tweet. Rahul Gandhi, who addressed Prime Minister Modi, said that when you were busy destabilizing the Congress-elected government, you did not notice a 35 percent decline in crude oil prices globally. Can you reduce the petrol price by Rs 60 per liter and give it to the citizens of the country? This will strengthen the country’s stagnant economy.

 

Web News Title: Story Modiji while you were busy destabilizing an elected congress government you may have missed this says congress leader Rahul Gandhi.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x