22 January 2025 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL
x

युपी राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात पवारांकडून मुस्लिम कार्ड; २०२४'चे संकेत?

Sharad Pawar, Uttar Pradesh, Loksabha Election 2024

लखनऊ: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टची बुधवारी दिल्लीमध्ये पहिली बैठक पार पडली. या ट्रस्टवरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. ‘राम मंदिराच्या उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

“तुम्ही जसं राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापना करू शकता, मशिदीच्या उभारणीसाठी ट्रस्ट का निर्माण करू शकत नाही ? देश तर सर्वांचा आहे, सर्वांसाठी आहे.” असं शरद पवार म्हणाले आहेत. ‘एएनआय’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे २०२४’मध्ये राम मंदिराचं कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे आणि २०२४ मधील निवडणूक त्याच म्हणजे हिंदू-मुस्लिम अशाच होण्याचे संकेत सर्वच पक्षांना मिळाले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकरणात मुस्लिम आणि दलितांच्या मतांना मोठं महत्व असल्याने पवारांनी नेमकं तेच मुस्लिम कार्ड उत्तर प्रदेशातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात टाकल्याचं राजकीय विश्लेषक मानतात.

पवार कोणाचीही गोष्ट सहज करत नाहीत तर त्यामागे त्यांची मोठी योजना असते. मार्च नंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित झाला आहे. त्यावेळी शिवसेना पुन्हा हिंदुत्ववादी असल्याचं देसहभार संदेश देऊन, आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडीकरून सरकार चालवत असल्याने आम्हाला, हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही घटक महत्वाचे असल्याचा संदेश देणार आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची लोकसभा तसेच विधानसभेत आघाडी होण्याचे संकेत देखील मिळत आहेत. त्याचीच तयारी पवारांनी उत्तर प्रदेशात सुरु केल्याचं म्हटलं जातं आहे.

अयोध्येतील वादग्रस्त भूमीवर राम मंदिर होते, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तसेच तिथे राम मंदिर बांधण्यासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याची घोषणा संसदेत केली होती. त्यानंतर बुधवारी या ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाला होती. या बैठकीत महंत नृत्य गोपाल यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती.

 

English summary: Form trust for mosque in ayodhya, Sharad Pawar Demands, The Supreme Court of India verdict that the Ram temple was located on the disputed land of Ayodhya Uttar Pradesh.

Web Title: Story NCP President Sharad Pawar played a Muslim Card in Uttar Pradesh before Loksabha Elction 2024.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x