21 November 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News
x

आनंदवार्ता! देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ

Covid 19, Corona Crisis, India

नवी दिल्ली, १७ एप्रिल: कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या देशात १३५०० च्या घरात गेलेली असतानाच एक दिलासादायक माहिती पुढे आली आहे. कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढली आहे. याचाच अर्थ रुग्ण कोरोनातून बरे होत असल्याचे प्रमाणही वाढले आहे.

शुक्रवारी सकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या देशात १७४८ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच ही माहिती दिली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची टक्केवारी १३ इतकी आहे. मागील आठवड्यात ही टक्केवारी अवघी ८ इतकी होती. ती या आठवड्यात १३ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात करोनाचे २८८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही आता ३२०४ एवढी झाली आहे. मागील १२ तासांमध्ये महाराष्ट्रात करोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनामुळे १९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्राच्या काळजीत नक्कीच भर घालणारी ही बातमी आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या रोज वाढते आहे. ३ हजारांपुढे रुग्णसंख्या असलेलं महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

 

News English Summary: According to data obtained by Friday morning, the number of patients recovered from corona infection has reached 1748 in the country. This is the information provided by the Union Health Ministry. The percentage of people recovering in the country is 13% compared to the total coronary artery disease. In the previous week, the percentage was only 8. That’s up 13 percent this week.

News English Title: Story nearly 13 percent of Covid 19 patients recover across India up since last weeks 8 percent News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x