15 November 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

बापरे! निजामुद्दीन मरकजमध्ये चीनसह तब्बल ६७ देशातून आले होते २०४१ नागरिक

Corona Crisis, Covid 19, Nizamuddin Markaz 2041 foreigners

नवी दिल्ली, २ एप्रिल: दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये १५, १६ आणि १७ मार्च रोजी कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच देशभरात मोठी खळबळ उडाली. या क्रार्यक्रमात इंडोनेशियाचे ५५३, बांगलादेशचे ४९७, थायलंडचे १५१, किरगिस्तानचे १४५, मलेशियाचे ११८, चीनचे ९ आणि अन्य देशाताली ५७७ नागरिक सहभागी झाले होते. यामधील अनेक जण हे पर्यटन व्हिसावर भारतात आले होते. अशात ते धार्मिक कार्यक्रमात कसे सहभागी झाले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांचा व्हिसा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्ली पोलिसांनी तयार केलेल्या अहवालात असे देखील म्हटले आहे की, देशातील १८ राज्यांमधील लोकं मोठ्या संख्येने सहभागी झाली होते. याचा तपास देखील दिल्ली पोलिसांकडून सरु आहे. यामध्ये तामिळनाडूतील ५०१, आसाममधील २१६, उत्तर प्रदेशमधील १५७, महाराष्ट्रातील १०९, हरियाणातील २२, उत्तराखंडमधील ३४, मध्य प्रदेशमधील १०७, बिहारमधील ८६, पश्चिम बंगालमधील ७३, हैदराबादमधील ५५, झारखंडमधील ४६ आणि कर्नाटकातील ४५ जण सहभागी झाले होते.

तत्पूर्वी, निजामुद्दीनमधील तबलिग जमात मरकजच्या मौलानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारच्या आदेशांचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदीचे आदेश देऊनही आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना असतानाही त्या न पाळल्याचा मौलानांवर आरोप आहे.

दिल्लीतील निझामुद्दीन तबलिगी मर्कझ येथील धार्मिक कार्यक्रमात पुण्यातील १३० हून अधिक लोक उपस्थित होते, आतापर्यंत यातल्या ६० लोकांना शोधून विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या १३० पुण्यातील लोकांचा शोध घेतला जात आहे त्यातले अनेक लोक हे सध्या पुण्यात नाही किंवा त्यांचा शोध लागत नाही अशीही माहिती त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी देखील या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस दिली होती तरी त्यांनी मोठ्याप्रमाणावर लोकांना जमवलं होतं हे देखील व्हिडिओत उघड झालं आहे.

 

News English Summary: India has a lockdown on the backdrop of Corona. During the lock down, a religious event was also held in Merkaj, the headquarters of the Tabligi community in Nizamuddin area of ​​Delhi. The program reported shocking information that about 2041 foreign nationals arrived in 67 countries, including China, in March. This disturbing disclosure was made in a report prepared by the crime branch of the Delhi Police for investigation of the matter. Indonesia, Bangladesh and Thailand were the most attended.

 

News English Title: Story Nizamuddin Markaz 2041 foreigners came from 67 countries including China Corona Crisis Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x