22 January 2025 9:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

गुजरात: अहमदाबादमध्ये ५ दिवसांत दर २४ मिनिटाला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Covid 19, Corona Crisis, Ahmedabad city

नवी दिल्ली, १७ एप्रिल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. मात्र, काही प्रमाणात कोरोनावर मात करण्यात यश आहे. गेल्या २४ तासात ८२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३ हजारांच्या घरात कोरोनाबाधित भारतात आहेत. तर कोरोनामुळे देशभरात ४२० जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू आणि राजस्थानात आहे.

तर महाराष्ट्र राज्यात २८६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. राज्यात काल दिवसभरात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर पोहोचली आहे. मुंबईतही १७७ रुग्ण वाढलेत. मुंबईत रुग्णांची संख्या २०७३वर पोहोचली आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाचे १९४ बळी गेले आहेत.

दरम्यान, गुजरातमधील अहमदाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. येथील एकूण रुग्णांपैकी ५९ टक्के रुग्ण अहमदाबादमधील आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रेड हॉटस्पॉट झोनमध्ये सामील असलेल्या अहमदाबादमध्ये गेल्या ५ दिवसांत दर २४ मिनिटाला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे.

आरोग्य मंत्रालयाने गुरुवारचे जे आकडे पाठवले आहेत. ते अत्यंत बोलके आहेत. गुजरातमध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंत ९२९ कोरोनाबाधित आढळून आले. यांपैकी ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या मुख्य आरोग्य सचिव जयंती रवी यांनी सांगितल्यानुसार, डॉक्टर्ससह एकूण २६ सरकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. एलजी हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि जीएमईआरएसमधील सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे.

 

News English Summary: Meanwhile, Ahmedabad in Gujarat has the highest number of coronary arteries. In Ahmedabad, 59 per cent of the total patients are from Ahmedabad. According to the Health Ministry, a corona-positive patient has been seen every 24 minutes in Ahmedabad, which is involved in the Red Hotspot Zone.

News English Title: Story one new corona positive case find Ahmedabad city every 24 minutes Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x