देशद्रोहाचा कायदा म्हणजे नक्की काय, हे ना केंद्राला समजलं ना केजरीवालांना: चिदंबरम
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि इतर नऊ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याला दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने पोलिसांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार पी चिदंबरम यांनी दिल्लीतील आप सरकारच्या निर्णयावर टीका केली.
चिदंबरम यांनी शनिवारी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशद्रोहाचा कायदा नक्की काय आहे हे समजून घेण्यात केंद्र सरकार इतकेच दिल्ली सरकार अपयशी ठरले आहे. कन्हैय्या कुमार आणि इतरांविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याला हिरवा कंदील दाखविण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयाचा मी विरोध करतो. या निर्णयाशी मी सहमत नाही.
राजद्रोह कानून की अपनी समझ में दिल्ली सरकार भी केंद्र सरकार से कम अनजान नहीं है।
श्री कन्हैया कुमार और अन्य के खिलाफ आईपीसी की धारा 124 ए और 120 बी के तहत मुकदमा चलाने के लिए दी गई मंजूरी को मैं पूरी तरह से अस्वीकृत करता हूं।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) February 29, 2020
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंबंधीची संमती दिल्ली पोलिसांना दिली आहे. कन्हैय्या कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या निर्णयामुळे कन्हैय्या कुमारच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.
दिल्ली सरकारच्या या निर्णयानंतर कन्हैया कुमार याने देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्या विरोधात राजद्रोहाचा खटला चालवण्याला मंजुरी दिल्याबद्दल मी दिल्ली सरकारला धन्यवाद देतो. हे प्रकरण गंभीरपणे घ्यावे अशी मी दिल्ली पोलिस आणि वकिलांना आग्रह करतो. या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात जलद गतीने सुनावणी व्हावी आणि टीव्हीवाल्या ‘आपकी अदालत’च्या जागी कायद्याच्या ‘अदालत’मध्ये न्याय मिळावा. सत्यमेव जयते, अशा शब्दांत कन्हैया कुमार याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय आहे प्रकरण?
२०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ परिसरात काही घोषणाबाजी करणाऱ्यांचे व्हिडीओ समोर आले होते. या घोषणा देशविरोधी होत्या. जेएनयूच्या विद्यार्थी परिषदेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाची फाईल गेल्या काही महिन्यांपासून पडून होती. आता दिल्लीतील केजरीवाल सरकारने कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास संमती दिली आहे. त्यामुळे कन्हैय्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
News English Summery: The political upheaval of the Aam Aadmi Party in Delhi has shown to the police a green lantern for lodging a sedition case against former president of Jawaharlal Nehru University Students’ Union Kanhaiya Kumar and nine others. Congress leader and MP P Chidambaram criticized the AAP government’s decision in Delhi.
Web News Title: Story P Chidambaram slams AAP for sanction to Prosecute JNU former student Kanhaiya Kumar for sedition.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC