24 November 2024 11:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

VIDEO- 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा देणारी अमूल्या न्यायालयीन कोठडीत

Pakistan Zindabad Sloganeer Amulya

बंगळुरू : नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात (CAA) बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. या तरुणीचं नाव अमूल्या असं आहे. उल्लेखनीय म्हणजे, ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मसलमीन’ (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर अमूल्यानं या घोषणा दिल्या.

CAA-NRC विरोधात ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुसलमीन अर्थात AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत गुरुवारी गोंधळ उडाला. एका तरुणीने थेट व्यासपीठावरून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तरुणीचे नाव अमूल्या असे सांगितले जात आहे. यानंतर सभेच्या ठिकाणी चांगलाच गोंधळ उडाला. तातडीने संबंधित तरुणीला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. त्यावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘भारत जिंदाबाद था और रहेगा’, आम्ही ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेचे समर्थन करत नाही.

ओवेसी काय म्हणाले ?-
हा सगळा प्रकार ओवेसी यांच्यासमोरच घडला. त्यानंतर ओवेसी यांनी या घटनेवर खुलासाही केला. “तरुणीनं दिलेल्या घोषणांचा मी निषेध करतो. ज्या तरुणीनं घोषणा दिल्या, तिचा आमच्याशी काहीही संबंध नाही. आमच्यासाठी भारतच जिंदाबाद होता आणि जिंदाबाद राहिल,” ओवेसी यांनी या प्रकारावर म्हटलं आहे.

 

Web Title: Story Pakistan Zindabad Sloganeer Amulya sent to 14 judicial custody after controversial comment.

हॅशटॅग्स

#MIM(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x