पिझ्झा होम डिलिव्हरी व्यक्तीला कोरोनाची लागण; ७२ ठिकाणी होम डिलिव्हरी केली
नवी दिल्ली, १६ एप्रिल: भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळपासून ३९ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा ४१४ वर पोहचला आहे. तर देशात आणखी १ हजार ११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १२,३८० वर पोहचला आहे.
दरम्यान, दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये पिझ्झाची होम डिलिव्हरी करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर या भागातील ७२ कुटूंबियांना सध्या होम क्वारंटाईन (घरातच विलगीकरण) पद्धतीने राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दक्षिण दिल्लीचे जिल्हाधिकारी बी एम मिश्रा म्हणाले, गेल्या महिन्याभरापासून ही व्यक्ती आजारी होती. त्याला खोकल्याचा त्रास होता. त्याने रुग्णालयात दाखवले सुद्धा होते. पण हा सामान्य खोकला असल्याचे सांगत त्याला घरी पाठविण्यात आले होते. पण महिना झाला तरी खोकला कमी होत नाही म्हणून या व्यक्तीला आरएमएल रुग्णालयात पाठविण्यात आले. तिथे चाचणी केल्यावर त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. ११ एप्रिलला या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्या दिवशी त्याने एकूण ७२ ठिकाणी पिझ्झाची डिलिव्हरी केली होती. त्यामुळे या सर्व कुटूंबियांना सध्या होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशात मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, जयपूर आणि आग्रासारख्या प्रमुख शहरात करोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहेत. या शहरामध्ये करोनाबाधिंताची संख्या जास्त आहे. या सर्व भागांना रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आले असून येथे १०० टक्के लॉकटाउन पाळण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रमुख शहरामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. ज्या ठिकाणी करोनाचा शिरकाव झालेला नाही तिथे काही गोष्टी शिथील केल्या जातील मात्र लॉकडाउन कायम असेल असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
News English Summary: Meanwhile, a home delivery of pizza in Malviya Nagar, south Delhi, has revealed that a corona virus has been infected. Following the incident, 72 families in the area have been instructed to live in the home quarantine system at present.
News English Title: Story Pizza delivery boy tests Covid 19 positive in Delhi 72 families told to home quarantine News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH