11 January 2025 4:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

'संपर्क फॉर समर्थन'चा दुसरा अध्याय; लॉकडाउन टाईममध्ये मोदींनी हेतू साधला?

Corona Crisis, Covid 19

नवी दिल्ली, ३ एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी क्रीडा क्षेत्रातील आघाडीच्या ४० खेळाडूंसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, माजी क्रिकेटर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर, बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू, धावपटू हिमा दास यांच्यासह अन्य काही खेळाडूंनी चर्चेत सहभाग घेतला होता. कोरोनाविरोधातील सामना जिंकण्यासाठी मोदींनी दिग्गज खेळाडूंना पाच सूत्री मंत्र दिलाय.

देशात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची देशातील संख्येने दोन हजारी पार केली असून पन्नासहून अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा द्यायचा आहे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्यांनी तिसऱ्यांदा देशवासियांना संदेश दिला. आंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी संकटाचा धैर्याने सामना करायचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे घरी मोकळे बसलेल्या लोकांना त्यांनी वेगळा टास्क दिला आहे. त्यामुळे देशातील करोडो मोबाईलवर त्याची फुकट मार्केटिंग सुरु झाली आहे.

तत्पूर्वी म्हणजे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने २०१८’मध्येच सुरु केली होती. त्यासाठी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी “संपर्क फॉर समर्थन’ शीर्षकाच्या नावे एक अभियान राबवून अनेक प्रतिष्टीत व्यक्तीची भेट घेऊन भाजपाला समर्थन करण्याचं आवाहन केलं होतं. विशेष करून त्यावेळी असे सेलिब्रेटी निवडण्यात आले होते ज्यांचे समाज माध्यमांवर मोठा चाहता वर्ग आहे.

मात्र आता लॉकडाउन असल्याने मोदींनी देशातील ४० प्रतिष्ठित खेळाडूंना निवडलं असून आज त्यांना कोरोना आपत्तीकाळातील जवाबदारी दिली आहे. वास्तविक नीट निरीक्षण केल्यास त्या सर्व खेळाडूंनी आधीच समाज माध्यमांवर जनजागृती मोहीम सुरु केली आहे. परंतु, मोदींसोबतच्या व्हिडिओ मीटिंग नंतर मोदींच सोशल मीडिया अकाउंट्स याच खेळाडूंच्या प्रतिक्रियेतून फुलून गेली आहेत आणि मोदींचं मार्केटिंग त्या खेळाडूंच्या अकाऊंटवरून सुरु झालं आहे. त्यात कोरोना राहिला बाजूला मोदींचे गुणगान सुरु झाले आहेत. दुसऱ्या बाजूला महागडे खेळाडू जे एका ट्विट किंवा फेसबुक पोस्टसाठी करोडो रुपये आकारतात त्यांनी या व्हिडिओ मीटिंग’नंतर देखील मोदींबाबत कोणतंही ट्विट केलेलं नाही यावरून काय ते समजून जावं.

एकमात्र खरं आहे की मोदींनी कलाक्षेत्र, क्रीडाक्षेत्र आणि सामान्य माणूस देखील आपत्तीच्या काळात स्वतःवर केंद्रित केला असून, जेव्हा कधी कोरोना आपत्तीचा कठीण काळ संपेल आणि काही राज्यांच्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा लोकांना कळेल की यामागे नेमका काय उद्देश होता. कारण आज खऱ्याअर्थाने सर्व राज्यातील मुख्यमंत्री झटत आहेत, मात्र विधानसभा निवडणुकीत मोदी कधीच तिथल्या सामान्यांना याची जाणीव करून देणार नाहीत, उलट केलीच तर टीका करतील आणि याचा प्रत्यय देशाला पश्चिम बंगाल आणि बिहारच्या निवडणुकीत येईलच.

 

News English Summary: The country is virtually overwhelmed by the corona virus. More than two thousand of the coronary population have crossed the country and more than fifty have lost their lives due to corona. Narendra Modi appealed that all should fight together to fight the global crisis. He sent a message to the countrymen for the third time on Friday in the wake of Corona. He said the crisis has to be bold in order to move from darkness to light. Therefore, they have given a separate task to those who are free at home. Due to this, its free marketing has started on millions of mobiles across the country.

 

News English Title: Story PM Modi spelled out a five point mantra to tackle the Corona virus pandemic as he addressed over 40 Sportsperson via a video conference News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x