VIDEO - मी ईश्वराला पाहिलं नाही, पण मोदीजी मी तुम्हाला पाहिलंय...सविस्तर वृत्त

नवी दिल्ली : ‘मी ईश्वराला पाहिलं नाही, पण मोदीजी मी तुम्हाला पाहिलंय’… एका महिलेचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले इतकंच नाही तर त्यांना अश्रू आवरणंही कठिण झालं. जन औषधी दिवसानिमित्तानं आज पंतप्रधानांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी, अर्धांगवायूनं पीडित एका महिलेनं पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधला. ‘जन औषधांमुळेच आज माझी प्रकृती सुधारत चाललीय आणि खर्चही कमी झालाय’ असं या महिलेनं पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना म्हटलं.
दीपा शाह असं या महिलेचं नाव आहे. सन ‘२०११ साली मला अर्धांगवायूचा झटका आला होता. यामुळे मला नीटसं बोलताही येत नव्हतं. यासाठी मला जे उपचार सुरू होते ते खूप महागडे होते. त्यामुळे घर चालवणंही कठिण जात होतं. परंतु, जन औषधी (जेनरिक) घेणं सुरू केलं आणि पैसाही वाचला. यापूर्वी मला महिन्याला 5 हजार रुपयांची गरज पडत होती, पण आता केवळ १५०० रुपयांमध्ये माझे औषधे मला मिळतात, असे या लाभार्थी महिलने मोदींनी बोलताना म्हटले. तसेच, या उरलेल्या 3 हजार रुपयांमध्ये मी माझ्यासाठी फळ आणि इतर गरजेच्या गोष्टी विकत घेऊ शकते, असेही तिने सांगितले.
अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींना रडू कोसळलं pic.twitter.com/UWOgLLvPBn
— Lokmat (@MiLOKMAT) March 7, 2020
मोदीजी, मी ईश्वर पाहिला नाही, मला मला तुमच्याच ईश्वर दिसतो, असेही तिने म्हटले. आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत ती रुग्ण महिला मोदींशी संवाद साधत होती. या पीडित रुग्ण लाभार्थीच्या मनातील भावना आणि शब्दांमुळे मोदी भावुक झाले. मोदींना आपल्या डोळ्यातील अश्रू थांबवता आले नाही. तुमची ध्येयासक्ती हीच तुमचा देव आहे, तुम्ही आजारपणाला पराभूत केलंय, असे म्हणत मोदींनी पीडित रुग्ण महिलेचा आत्मविश्वास बळकट केला. दरम्यान, सध्या मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
News English Summery: ‘I have not seen God, but I have seen you, Mr. Modi.’ Today, the Prime Minister interacted with the citizens on the occasion of Jana Medici. This time, a woman suffering from paralysis interacted directly with Prime Minister Modi. Talking to Prime Minister Modi, the woman said, “Today, due to public medicines, my health is improving and my expenses are also reduced.” Deepa Shah is the name of this woman. In the year 2011, I was paralyzed. Because of this I could not speak very well. The treatment I was starting to get was very expensive. So it was getting harder to run a house. But, people started taking generics and saved money. Earlier, I used to need Rs 5,000 a month, but now I get my medicines for only 1500 rupees, ”said the beneficiary woman. Also, for the remaining 3,000 rupees, I can buy fruit and other necessities for me, ”she said
News English Title: Story seeing her crying even made PM Narendra Modi emotional and cry front Dipa Shah.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल