13 January 2025 5:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअर 2 रुपयांच्या खाली घसरला, 350% परतावा देणारा स्टॉक HOLD करावा की SELL - NSE: GTLINFRA Scheme Monthly Benefits | महिलांनो, प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळतील, अत्यंत खास योजना, पटापट अर्ज करा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: JIOFIN Post Office Scheme | महिलांनो 2 वर्षांत 2 लाख रुपये मिळवायचे असतील तर 'या' योजनेत पैसे गुंतवा, मजबूत फायदा होईल Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर 45 टक्क्यांनी घसरला, आता तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा - NSE: RVNL
x

'मुनगंटीवार के हसीन सपने' पुस्तकाची प्रस्तावना मीच लिहीन - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Mungantiwar Ke Hasin Sapane Book

लखनौ: महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राऊतांनी टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर आहेत. सोबत पती रश्मी ठाकरे आणि चिरंजिव आदित्य ठाकरे असतील. शनिवारी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री रामाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणजे रामाचा प्रसाद आहे. रामलल्लाच्या कृपेनेच उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

“शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. करोनाचा जसा प्रादुर्भाव पसरतोय त्यामुळे जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्यापासून भाजपचे नेते दररोज नवनवीन विधाने करत आहेत. यात सुधीर मुनगंटीवार हे आघाडीवर असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर ‘मुंगेरीलाल के सपने’ सारखे ‘मुनगंटीवार के सपने’ असं पुस्तक पाच वर्षानंतर प्रसिध्द करु असा टोला लगावला होता. याचा दाखला देत राऊतांनी या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिणार असल्याचे सांगितले.

 

News English Summery: BJP leaders and former state finance minister Sudhir Mungantiwar, who raised questions about the stability of the government leading the development, found that Rauta had taken a beating. Meanwhile, Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray is due to visit Ayodhya tomorrow (March 7). The husband will be accompanied by Rashmi Thackeray and Chiranjeev Aditya Thackeray. Chief Minister will meet Rama at around 7:30 pm on Saturday. Uddhav Thackeray is the Chief Minister of Rama. By the grace of Ramlalla, Uddhav Thackeray has become the Chief Minister of Maharashtra today, said Shiv Sena MP Sanjay Raut at a press conference. Since the change of power in Maharashtra, BJP leaders have been making new statements every day. In this, Sudhir Mungantiwar seems to be at the forefront. NCP State President and Water Resources Minister Jayant Patil had accused BJP leader Sudhir Mungantiwar of publishing a book like ‘Mungertiwal K Sapne’ like ‘Mungertiwal K Sapne’ five years later. Rauta cited this and said that I would write a preface to this book.

 

Web News Title: Story Shivsena MP Sanjay Raut attacks BJP Leader Sudhir Mungantiwar says I will write preface to Mungantiwar Ke Sapane Book.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Sudhir Mungantiwar(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x