23 February 2025 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

अत्यंत निघृण आणि अमानुष! मंदिरात दोन संत साधुंची हत्या झाली आहे

Shivsena MP Sanjay Raut, Murder Of Sadhu In Uttar Pradesh

मुंबई, २८ एप्रिल: उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. गावातील मंदिरात मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पालघर घटनेचा उल्लेख करत या घटनेला धार्मिक रंग देऊ नये असं आवाहन केलं आहे.

उत्तर प्रदेशात दोन साधूंची हत्या झाल्याचं वृत्त आल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावरून भाजपला टोले लगावले आहेत. उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातील मंदिरात दोन साधूची हत्या झाली आहे. हे अत्यंत निर्घृण आणि अमानुष आहे. पण सर्व संबंधितांनी या विषयाचं पालघरप्रमाणे राजकारण करू नये. देश करोनाशी लढत आहे. शांतता राखा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतीलच, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. तसंच ट्विटच राऊत यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर कोतवालीतील पगोना या गावात शिवमंदिरात गेल्या १० वर्षांपासून साधू जगनदास (५५ वर्षे) आणि सेवादास (३५वर्षे) राहात होते. सोमवारी रात्री या दोन्ही साधूंची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी भाविक मंदिरात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या दोन्ही साधूंचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मंदिराच्या आवारातच पडल्याचे दिसून आले. या घटनेने स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

 

News English Summary: The killing of two sadhus in Uttar Pradesh has caused a stir. The pattern was revealed after bodies were found in a temple in the village. Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has ordered an inquiry into the matter. Meanwhile, Shiv Sena MP Sanjay Raut, while reacting to the incident, referred to the Palghar incident and appealed not to give a religious color to the incident.

News English Title: Story Shivsena MP Sanjay Raut On Murder Of Sadhu In Uttar Pradesh News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x