5 November 2024 11:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

जातीचा दाखला रद्द; जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात

Solapur BJP MP Jay Siddheshwar Swamis

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याने सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य अडचणीत सापडले आहेत. बनावट जात प्रमाणपत्रा प्रकरणी खासदार शिवाचार्य यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जाती संदर्भात खुलासा करण्यासाठी जात पडताळणी समितीने खासदार डॉ. शिवाचार्य यांना नोटीस बजावली होती.

भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी तथा नूरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरे मठ यांनी लोकसभा निवडणुकीत गेल्या वर्षी बनावट जात प्रमाणपत्र सादर केले. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असून त्यांनी बेडा जंगम जातीचा बनावट दाखला तयार केला आहे, असा आरोप करत अपक्ष उमेदवार व माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली त्यानंतर या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली. दरम्यान या प्रकरणी लवकरच हायकोर्टात सुनावणीची शक्यता वर्तविण्यात आली होती.

त्यानंतर भाजपचे सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचं सांगत तो रद्द केला आहे. जयसिद्धेश्वर स्वामी हे सोलापूर या राखीव मतदारसंघाचे खासदार आहेत. जातीचा दाखलाच रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी आता धोक्यात येण्याची चिन्हं आहेत.

आज निकाल देण्यासाठी तक्रारादरांना समितीने बोलावून घेतले आहे असे गायकवाड यांनी सांगितले. निकाल आमच्या बाजूने लागला असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले. १५ फेब्रुवारी रोजी अंतिम युक्तीवादात खासदार जयसिद्धेश्वर यांचे वकील संतोष न्हावकर यांनी दक्षता पथकाने फसली उताºयाबाबत दिलेल्या अहवालावर म्हणणे दाखल केले होते. दक्षता पथकाने दबावाखाली अहवाल दिलेला आहे. तक्रारदारांच्या सांगण्यावरून तयार करण्यात आलेला हा अहवाल रद्दबातल करून दक्षता पथकातील उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांना बदलून नवीन अधिकाºयांमार्फत अहवाल मागविण्यात यावा असा अर्ज दाखल केला.

 

 

 

News English Summery: Solapur BJP MP Dr. Jai Siddheshwar Shivacharya is in trouble. A petition has been filed in the Mumbai High Court against MP Shivacharya over the fake caste certificate case. In view of this petition, the High Court had directed all the respondents to serve notice. Accordingly, the caste verification committee MP Dr. Notice was given to Shivacharya.

 

Web Title: Story Solapur BJP MP Jay Siddheshwar Swamis caste validity certificate declared invalid.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x