5 November 2024 10:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; २० प्रवाशांचा जागीच मृत्यू

Story Tamil Nadu state Bus and Truck Heavy Accident

अविनाशी : तमिळनाडूमधील अविनाशी परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि लॉरीची भीषण धडक झाली. या भीषण अपघातात २० जणांचा जागीच मृत्यू झाला असून २४ जण जखमी आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघातग्रस्तांपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. या भीषण अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी या शहराजवळ झाला. अपघातग्रस्त बस बेंगळुरूहून केरळ राज्यात जात होती. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. या अपघातातील जखमींना तातडीने तिरुपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये एकूण ४८ प्रवासी प्रवास करत होते. यात २० जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बाकी प्रवाशी जखमी झाले. मृतांमध्ये १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे.

 

Web Title: Story Tamil Nadu state Bus and Truck Heavy Accident 19 people dead 24 injured.

 

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x