21 November 2024 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News
x

अन्यथा फक्त अहमदाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८ लाखांवर जाईल - मनपा आयुक्त

Corona Crisis, Covid 19, Gujarat

अहमदाबाद, २५ एप्रिल: देशात गेल्या २४ तासांत १ हजार ४२९ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे तर ५७ जण मृत्युमुखी पडले आहेत. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आता देशांत कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा २४ हजार ५०६ वर पोहोचला आहे. या आकडेवारीपैकी भारतात सध्या १८ हजार ६६८ रुग्ण हे कोरोनावर उपचार घेत आहेत तर ५ हजार ६३ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले आहेत.

गुजरातच्या अहमदाबाद शहराला करोनानं घट्ट विळखा घातल्याचं चित्र दिसतंय. करोना व्हायरस संक्रमित व्यक्तींची संख्या इथं दिवसेंदिवस वाढत जाताना दिसतेय. याच दरम्यान अहमदाबाद मनपा आयुक्तांनी संपूर्ण शहरालाच हादरवून टाकणारी शक्यता व्यक्त केलीय. येत्या चार दिवसांत रुग्णांची संख्या दुप्पटीनं वाढणं थांबलं नाही तर मे महिन्याच्या शेवटपर्यंत शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८ लाखांपर्यंत पोहचेल, असं अहमदाबादचे आयुक्त विजय नेहरा यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटलंय. यापूर्वीच अहमदाबादमध्ये सरकारी इस्पितळाच्या बाहेर कोरोना रुग्णांचे कसे हाल होतं आहेत ते समोर आलं आहे.

अहमदाबादमध्ये आत्तापर्यंत १,६३६ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैंकी ७५ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागलेत तर १०५ जण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत, अशी माहिती नेहरा यांनी या व्हिडिओत दिलीय. ‘वर्तमानत अहमदाबादमध्ये प्रत्येक चार दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होताना दिसतेय. हीच परिस्थिती सुरू राहिली तर करोनाबाधितांची संख्या १५ मे पर्यंत ५०,००० आणि ३१ मेपर्यंत जवळपास आठ लाखांवर पोहचेल’ अशी चेतावणीही नेहरा यांनी दिलीय.

 

News English Summary: Ahmedabad Municipal Commissioner has expressed the possibility of shaking the entire city. If the number of patients does not stop doubling in the next four days, the number of coronary heart disease patients in the city will reach 8 lakh by the end of May, Ahmedabad Commissioner Vijay Nehra said in a video message.

News English Title: Story there may be 8 lakh Covid 19 patients in Ahmedabad by the end of may says municipal commissioner Vijay Nehra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x