13 January 2025 12:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा Credit Card Alert | 'या' व्यक्तींनी चुकूनही क्रेडिट कार्डचा वापर करू नये; कर्ज तर वाढेलच आणि सिबिल स्कोर देखील खराब होईल Home Loan Prepayment | गृहकर्ज मुदतीपूर्वी फेडताय, प्री-पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या पेनल्टी चार्जेस किती भरावे लागतील
x

अत्यावश्यक वस्तू आणि इतर सर्वप्रकारच्या माल वाहतुकीला केंद्राची परवानगी

Corona Crisis, Lock Down, Good Transportation allowed

नवी दिल्ली, २९ मार्च: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणखी कठोर उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्र्यांची आज दिल्लीत बैठक पार पडली. कोरोनाच्या संबंधित आणि लॉकडाउन मुद्द्यावर ही बैठक बोलावण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.

केंद्रीय मंत्र्यांच्या या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्यासह इतर प्रमुख मंत्री या बैठकीत उपस्थित होते. देशातील करोनाच्या परस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर देशांतर्गत माल वाहतूक सेवा त्यात जीवनावश्यक वस्तुंची आणि इतर वस्तूंची माल वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून अनेक जीवनावश्यक वस्तू संबंधित दुकानं खुली असली तरी त्यांच्याकडे माल पोहोचत नव्हता आणि त्यामुळे सामान्य लोकांची देखील मोठी अडचण झाल्याचं समोर आलं होतं. मात्र या निर्णयामुळे दुकानांवर माल पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र त्यातही कामगार नसल्याने माल उतरविण्याची मोठी अडचण निर्माण होऊ शकते. अगदी वर्तमानपत्र देखील लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने तो विषय सरकार दरबारी पोहोचविण्यात आला होता.

 

News English Summary: The central government has taken more drastic measures to prevent the spread of corona. Against this backdrop, a meeting of Union Ministers was held in Delhi today. The meeting was convened on Corona’s related and lockdown issue. The meeting was held at the residence of Union Home Minister Rajnath Singh. Home Minister Amit Shah, Information Minister Broadcasting Minister Prakash Javadekar, Petroleum Minister Dharmendra Pradhan, Textile Industries Minister Smriti Irani and other prominent ministers were present in the meeting. The meeting reviewed the status of coronas in the country. Subsequently, domestic freight services are allowed to transport essential goods and other goods.

 

News English Title: Story Transportation of all goods without distinction of essential and non essential have been allowed during lock down News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x