19 April 2025 8:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

आम्ही डॉक्टरांना सुरक्षा पुरवतो, तुम्ही आंदोलन करु नका; गृहमंत्र्यांची विनंती

Covid 19, Corona crisis, Union Home Minister Amit Shah

नवी दिल्ली, २२ एप्रिल: देशावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांची टीम रात्रं-दिवस मेहनत करत आहे. अशामध्ये नागरिकांनी कोरोना तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांच्या टीमवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या घटनांना लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टरांना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र एक करून काम करत आहेत. अशा परिस्थितीत काही ठिकाणी डॉक्टरांवर हल्लेही करण्यात आले. त्यावर आता सर्व संबंधित राज्य सरकारांनी कारवाई केली आहे. तसंच अमितश शाह यांनी त्यांना सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. यापूर्वी शनिवारी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील करोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी अमित शाह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.

डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) २३ एप्रिल रोजी काळा दिवस मानण्याची घोषणा केली आहे. आयएमएच्या विरोधाला लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी आयएमएच्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फर्न्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी अमित शहा यांनी डॉक्टरांना विरोध प्रदर्शन करु नका असे आवाहन केले आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार भारतात १९ हजार ९८४ जणांना करोनाची बाधा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यापैकी १५ हजार ४७४ जणांवर उपचार सुरू असून ३ हजार ८७० जण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर ६४० जणांचा करोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

News English Summary: The crisis of corona in the country is growing day by day. The team of doctors is working day and night in the battle against Corona, regardless of their own lives. There have been frequent incidents of civilians attacking a team of doctors who came to check on the corona. In view of these incidents, Union Home Minister Amit Shah has promised to protect doctors.

News English Title: Story Union Home Minister Amit Shah assured doctors security and appealed to them to not to do even symbolic protest as proposed by them Covid 19 News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या