23 February 2025 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मोदींनी गरिबी झपाट्याने कमी केली? ट्रम्प यांचं विधान खोटं; काय आहे MPI रिपोर्ट? - सविस्तर

US President Donald Trump, PM Narendra Modi

अहमदाबाद: अहमदाबादमधील मोटोराच्या क्रिकेट स्टेडियमवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखोच्या जनसमुदायाला संबोधित केले. दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी ‘नमस्ते ट्रम्प’ या जंगी कार्यक्रमातील आपल्या भाषणात भारतातील अनेक गोष्टींचे कौतुक केले. भारतीयांच्या क्षमतेवर भाष्य करताना ट्रम्प यांनी विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळाले.

मोदी यांनी चहावाला ते भारताचा पंतप्रधान असा प्रवास केला आहे. मोदी म्हणजे कठोर कष्टाचं आणि मेहनतीचं उदाहरण आहे. मोदींच्या नेतृत्वात भारत वेगानं पुढे जातोय. मोदींच्या नेतृत्वामुळे भारत गरीबीतून बाहेर पडतोय असं म्हणताच मोदींच्या चेहऱ्यावर साह्य फुललं. मात्र ट्रम्प यांच्या भाषणातील काही मुद्दे मोदी सरकारच्या विविध योजनांचे होते आणि त्यातील वास्तव वेगळंच असताना ट्रम्प यांनी जे मांडलं ते भारत सरकारनेच लिहून दिलं होतं का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यातील सर्वात आश्चर्यकारक उल्लेख म्हणजे मोदींमुळे देश गरिबीतून वेगाने बाहेर पडत आहे. यावरून ट्रम्प यांनी अधिकृत माहिती नेमकी कुठून मिळाली हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

‘बार्कलेज् हुरून रिच लिस्ट’च्या २०१८ मधील अहवालानुसार भारतातील गरीब आणि श्रीमंत यांच्यामधील दरी वाढत असल्याचे समोर आलं होतं. देशातील केवळ ८३१ लोकांकडे देशाचा २५ टक्के ‘जीडीपी’ आहे, असे ‘बार्कलेज हुरून’च्या अहवालात म्हटले आहे.

आपल्या देशातील एकूण संमत्तीच्या वाटपात गरीब आणि श्रीमंत वर्गात मोठी तफावत असल्याचा आरोप अनेक अर्थतज्ज्ञांनी देखील अनेकवेळा केला आहे. त्यात दारिद्रय रेषेखालील लोकांची परिस्थिती खूपच हलाकीची असल्याचे अनेक अहवाल यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान गरिबी कमी करण्यासाठी महत्तवपूर्ण प्रयत्न करणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचा देखील सहभाग आहे. मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स २०१९ (MPI) च्या रिपोर्टमध्ये सदर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतातील झारखंड सर्वात गरिब राज्य असून तेथील गरिबी वेगाने कमी होत असल्याचं म्हटलं आहे. हा रिपोर्ट ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यांनी संयुक्तपणे तयार केला होता. रिपोर्टनुसार, २००५-०६ ते २०१५-१६ दरम्यान २७.१ कोटींना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यात आलं. यामध्ये झारखंड राज्यात सर्वात वेगाने गरिबी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २००५-०६ ते २०१४ पर्यंत देशात काँग्रेसशासित युपीएची सत्ता होती तर याच अहवालानुसार मोदी सरकारचा कार्यकाळ एका वर्षाचा आहे हे अधोरेखित होतं.

गरिबी कमी करण्यासाठी मुख्यत्वे दहा मुख्य मुद्द्यांचा विचार करण्यात आला होता. यामध्ये संपत्ती, स्वयंपाक इंधन, स्वच्छता आणि पोषण यांचा समावेश आहे. एमपीआयमध्ये १०१ देशांमधील आरोग्य, शिक्षण आणि जीवनाचा स्तर मुख्यत्वे लक्षात घेतला होता. रिपोर्टमध्ये सांगण्यात आल्यानुसार, भारताने दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यासाठी गरिबांच्या हिताची धोरणं राबवली हे स्पष्ट होत आहे. झारखंड एक असं राज्य आहे जिथे २००५-०६ ते २०१५-१६ या १० वर्षांमध्ये गरिबी ७४.९ वरुन कमी होऊन ४६.५ टक्के राहिली आहे. भारतामधील ४ राज्यं बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक एमपीआय आहे. झारखंडने यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत त्या ३ देशांमध्ये सहभागी झाला आहे जिथे ग्रामीण क्षेत्रात कमी होणारं गरिबीचं प्रमाण शहरांपेक्षाही जास्त आहे.

रिपोर्टनुसार, भारत देशाने आपल्या येथील गरिबी ५५.१ टक्क्यांवरुन खाली आणत २७.९ टक्के म्हणजे जवळपास निम्यावर आणली आहे. भारताने जवळपास २७.१ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. याआधी गरिब लोकांची संख्या ६४ कोटी होती, जी आता ३६.९ कोटींवर आली आहे. भारताव्यतिरिक्त गरिबी कमी करणाऱ्या देशांमध्ये भारताशिवाय पेरु, बांगलादेश, कंबोडिया, नायजेरिया, पाकिस्तान, व्हिएतनाम, इथोपिया, हैती आणि कांगो गणराज्य यांचा समावेश आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी मोदी सरकारला दिलेलं श्रेय चुकीचं असल्याचं अहवाल सांगतो.

 

 

News English Summery: Modi has journey from Chaiwala to the Prime Minister of India. Modi is an example of hard work and hard work. India is moving fast under Modi’s leadership. Modi’s leadership said that India was getting out of poverty. But some of the points in Trump’s speech were the various schemes of the Modi government, and while the reality of it was different, the question was raised whether the Indian government had written down what Trump had proposed. The most striking of them is that Modi is rapidly emitting poverty. From this, it may be a matter of research where exactly Trump obtained official information.

 

Web Title: Story US President Donald Trump talked about Poverty ratio in India.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x