5 November 2024 4:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

गुजरातचं वास्तव भिंतीआड झाकत मोदी-ट्रम्प भेटीवर चक्क १०० कोटी खर्च होणार

US President Donald Trump, PM Narendra Modi, Gujarat Visit

गांधीनगर: राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्या भारत दौऱ्यासाठी आपण अत्यंत उत्साही असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये विमानतळापासून ते मोटेरा स्टेडिअमपर्यंत ५ ते ७ लाख लोक माझं स्वागत करतील, असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या भारत दौऱ्यात मोटेरा स्टेडिअमच्या नूतनीकरणानंतर निर्माण झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडिअमचं लोकार्पण करणार आहेत. हे जगातलं सर्वात मोठं स्टेडिअम असेल.

जगातील सर्वात शक्तीशाली नेत्याच्या स्वगातासाठी गुजरातमध्ये स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरात सरकारकडून अहमदाबादमध्ये ठिकठिकाणी तयारी सुरू केली जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या तीन तासांच्या गुजरात दौऱ्यासाठी तब्बल १०० कोटींचा खर्च करण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर विमानतळ ते कार्यक्रम स्थळापर्यंतच्या प्रवासात ट्रम्प यांना झोपड्यांचं दर्शन होऊ नये यासाठी एक मोठी भिंतही उभारण्यात येते आहे.

१६ जानेवारी रोजी परराष्ट्र खात्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावित भेटीसंदर्भात मुत्सद्दी मार्गांद्वारे भारत आणि अमेरिका संपर्कात होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्ली येथे एका संमेलनादरम्यान सांगितले की “अनेक महिन्यांपासून अशी अटकळ बांधली जात आहे … पंतप्रधान मोदींनी जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा त्यांना भारतात आमंत्रित केले होते. दोन्ही देश आमच्याशी संपर्क साधत आहे. जेव्हा आम्हाला ठोस माहिती मिळेल तेव्हा ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.

 

Web Title: Story US President Donald Trumps 3 Hour Gujarat visit set to cost over rupee 100 crore.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x