22 November 2024 4:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत; वारीस पठाण यांचं संतापजनक वक्तव्य

MIM MLA Waris Pathan, Hindu Muslim

गुलबर्गा: ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे वादग्रस्त नेते माजी आमदार वारीस पठाण यांनी पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवणारं धक्कादायक वक्तव्य केलं आहे. एमआयएम’चे मुंबईतील माजी आमदार वारीस पठाण अशी वक्तव्य करण्यात माहीर असून, यापूर्वी देखील त्यांनी अशी धार्मिक भावना भडकवणारी विधानं केली आहेत.

सध्या देशभरात CAA आणि NRC आंदोलनं पेटली आहेत आणि त्यात सर्वाधिक प्रमाण हे मुस्लिम समाज आणि मुस्लिम संघटनांचं आहे. त्यामुळे हा संपूर्ण विषय हिंदू-मुस्लिम असाच झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करून मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी वारीस पठाण यांनी असं धार्मिक विधान केलं असावं असं म्हटलं जातं आहे.

वारीस पाठ आंदोलकांना संबोधित करताना म्हणाले की, “१५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट “असं ते म्हणाले आहेत. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी १६ फेब्रुवारी रोजी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे याप्रसंगी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची देखील उपस्थिती होती. या आंदोलनाच्या अनुषंगाने एमआयएम सुद्धा स्वतःची स्पेस बनवू इच्छित आहे असंच म्हणावं लागेल. त्यासाठी हिंदू मुस्लिम असं धार्मिक तेढ निर्माण करण्याचा एमआयएम’चा प्रयत्न असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे.

पुढे ते असं म्हणाले की, “केवळ शब्दांनी उत्तर देता येणार नाही, विटेला दगडाने उत्तर देणं आपण शिकलो आहोत. मात्र, एकत्र होऊन चालावं लागेल. स्वातंत्र्य घ्यावं लागेल व जी गोष्ट मागितल्याने मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागेल. हे लक्षात असू द्या. आता वेळ आली आहे, आम्हाला म्हणाले महिलांना पुढं केलं, आता तर फक्त वाघिणी बाहेर निघाल्या आहेत, तर तुम्हाला घाम फुटला. मग विचार करा आम्ही सोबत आलो तर काय होईल. १५ कोटी आहोत पण १०० कोटींना भारी आहोत, लक्षात ठेवा. असं पठाण यावेळी म्हणाले आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

 

Web Title: Story we 15 crore Muslims but well for 100 remember says MIM MLA Waris Pathan.

हॅशटॅग्स

#MIM(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x