मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही - उद्धव ठाकरे
अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. काँग्रेसशी युती करून शिवसेनेने हिंदुत्वापासून फारकत घेतली, या टीकेचा त्यांनी प्रतिवाद केला. मी भाजपपासून वेगळा झालोय, हिंदुत्वापासून नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. उद्धव ठाकरे संध्याकाळी ४ वाजता रामल्लाचे दर्शन घेणार आहेत. यानंतर ते पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील.
“में बीजेपी से अलग हुआ हूं, हिंदुत्व से नहीं। हिंदुत्व और बीजेपी अलग है।”
-शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/FtZp7QQTza— ShivSena – शिवसेना (@ShivSena) March 7, 2020
रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, मी तिसऱ्यांदा अयोध्येत आलो होते. अयोध्येते येणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी वारंवार अयोध्येत येईन. नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्येच मी मुख्यमंत्री झालो. मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या आधी आलो होतो. त्यावेळी चांगले यश मिळाले होते. मी अयोध्येला नियमित येत राहणार आहे. मी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेणार आहे.
शरयू नदीच्या तिरावर आरती करण्याची आमची इच्छा होती. मात्र, जगभरात पसरत असलेल्या करोना व्हायरसमुळे खबरदारी म्हणून ती स्थगित करावी लागली. मात्र, शरयू नदीची आरती करण्यासाठी मी पुन्हा येईन, असंही यावेळी ठाकरे म्हणाले. “महाराष्ट्रातून जे रामभक्त इथं येतील त्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला इथं जागा उपलब्ध करुन द्यावी, याठिकाणी आम्ही ‘महाराष्ट्र भवन’ उभारू अशी विनंती मी महाराष्ट्र सरकारच्यावतीनं करतो,” असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
News English Summery: Maharashtra Chief Minister and Shiv Sena party chief Uddhav Thackeray is on a visit to Ayodhya today. At this time, Uddhav Thackeray announced a grant of Rs 1 crore for the construction of Ram temple. At this time, Uddhav Thackeray also answered reporters’ questions. He opposed the criticism that Shiv Sena withdrew from Hindutva in coalition with the Congress. I am separated from BJP, not Hindutva. Uddhav Thackeray said that BJP is not Hindutva. Uddhav Thackeray will visit Ramla at 4 pm. After this they will depart again towards Mumbai.
Web News Title: Story We have separated from BJP but not from Hindutva said CM Uddhav Thackeray.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा