22 November 2024 11:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

संयुक्त राष्ट्राच्या अहवालात १० वर्षात गरिबी कमी झाली त्यात काँग्रेसचा काळ सर्वाधिक - सविस्तर

Indian Poverty, Uninited Nations

अहमदाबाद: अहमदाबादमधील मोटोराच्या क्रिकेट स्टेडियमवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लाखोच्या जनसमुदायाला संबोधित केले. दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी ‘नमस्ते ट्रम्प’ या जंगी कार्यक्रमातील आपल्या भाषणात भारतातील अनेक गोष्टींचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वामुळे भारत गरीबीतून बाहेर पडतोय असं म्हणताच मोदींच्या चेहऱ्यावर साह्य फुललं. मात्र ट्रम्प यांच्या भाषणातील काही मुद्दे मोदी सरकारच्या विविध योजनांचे होते आणि त्यातील वास्तव वेगळंच असताना ट्रम्प यांनी जे मांडलं ते भारत सरकारनेच लिहून दिलं होतं का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यातील सर्वात आश्चर्यकारक उल्लेख म्हणजे मोदींमुळे देश गरिबीतून वेगाने बाहेर पडत आहे. यावरून ट्रम्प यांनी अधिकृत माहिती नेमकी कुठून मिळाली हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.

आपल्या देशातील एकूण संमत्तीच्या वाटपात गरीब आणि श्रीमंत वर्गात मोठी तफावत असल्याचा आरोप अनेक अर्थतज्ज्ञांनी देखील अनेकवेळा केला आहे. त्यात दारिद्रय रेषेखालील लोकांची परिस्थिती खूपच हलाकीची असल्याचे अनेक अहवाल यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान गरिबी कमी करण्यासाठी महत्तवपूर्ण प्रयत्न करणाऱ्या दहा देशांमध्ये भारताचा देखील सहभाग आहे. मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स २०१९ (MPI) च्या रिपोर्टमध्ये सदर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतातील झारखंड सर्वात गरिब राज्य असून तेथील गरिबी वेगाने कमी होत असल्याचं म्हटलं आहे. हा रिपोर्ट ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यांनी संयुक्तपणे तयार केला होता. रिपोर्टनुसार, २००५-०६ ते २०१५-१६ दरम्यान २७.१ कोटींना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यात आलं. यामध्ये झारखंड राज्यात सर्वात वेगाने गरिबी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २००५-०६ ते २०१४ पर्यंत देशात काँग्रेसशासित युपीएची सत्ता होती तर याच अहवालानुसार मोदी सरकारचा कार्यकाळ एका वर्षाचा आहे हे अधोरेखित होतं.

गरिबी कमी करण्यासाठी मुख्यत्वे दहा मुख्य मुद्द्यांचा विचार करण्यात आला होता. यामध्ये संपत्ती, स्वयंपाक इंधन, स्वच्छता आणि पोषण यांचा समावेश आहे. एमपीआयमध्ये १०१ देशांमधील आरोग्य, शिक्षण आणि जीवनाचा स्तर मुख्यत्वे लक्षात घेतला होता. रिपोर्टमध्ये सांगण्यात आल्यानुसार, भारताने दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यासाठी गरिबांच्या हिताची धोरणं राबवली हे स्पष्ट होत आहे. झारखंड एक असं राज्य आहे जिथे २००५-०६ ते २०१५-१६ या १० वर्षांमध्ये गरिबी ७४.९ वरुन कमी होऊन ४६.५ टक्के राहिली आहे. भारतामधील ४ राज्यं बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक एमपीआय आहे. झारखंडने यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे भारत त्या ३ देशांमध्ये सहभागी झाला आहे जिथे ग्रामीण क्षेत्रात कमी होणारं गरिबीचं प्रमाण शहरांपेक्षाही जास्त आहे.

रिपोर्टनुसार, भारत देशाने आपल्या येथील गरिबी ५५.१ टक्क्यांवरुन खाली आणत २७.९ टक्के म्हणजे जवळपास निम्यावर आणली आहे. भारताने जवळपास २७.१ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. याआधी गरिब लोकांची संख्या ६४ कोटी होती, जी आता ३६.९ कोटींवर आली आहे. भारताव्यतिरिक्त गरिबी कमी करणाऱ्या देशांमध्ये भारताशिवाय पेरु, बांगलादेश, कंबोडिया, नायजेरिया, पाकिस्तान, व्हिएतनाम, इथोपिया, हैती आणि कांगो गणराज्य यांचा समावेश आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी मोदी सरकारला दिलेलं श्रेय चुकीचं असल्याचं अहवाल सांगतो.

 

 

News English Summery: According to the report, India has brought its poverty down from 5 per cent to 8.2 per cent, which is almost on the net. India has eradicated some 8 million people out of poverty. Earlier, the number of poor people was 6 crore, which now stands at 8 million. Apart from India, poverty reduction countries include Peru, Bangladesh, Cambodia, Nigeria, Pakistan, Vietnam, Ethiopia, Haiti and the Republic of Congo, other than India. Therefore, the report that Trump’s credit to the Modi government is incorrect.

 

Web Title: Story what says United Nations report about poverty in India.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x