आप'ची सुद्धा विकासासोबत 'हिंदुत्वाकडे' वाटचाल? भाजपच्या हिंदुत्वाला आव्हान देणार?
नवी दिल्ली: पुढील व्यापक राजकारणाचा विचार करता महाराष्ट्रात मनसेने हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला आहे. दिल्लीत देखील केजरीवाल सरकार विकासाच्या बळावर सत्तेत आलं आहे. मात्र देशातील प्रत्येक राज्यात निवडणुका निरनिराळ्या मुद्यांवर होतं असतात. त्यात दिल्लीच्या बाहेर आपला जनाधार नसून, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फळी देखील नाही. त्यामुळे दिल्लीबाहेर हातपाय पसरायचे असतील तर दिल्लीतील केलेल्या विकासाच्या आडून प्रचार करत स्वतःची हिंदुत्वाला मानणारी आम आदमी पार्टी अशी प्रतिमा बनवायची आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
लवकरच बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. बिहारमध्ये निवडणुकीत जातील प्रचंड महत्व आहे आणि प. बंगालमध्ये देखील भाजपने हिंदुत्वाच्या नावे प्रचार करण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मतदान करेल याची आपला खात्री असल्याने तिथे केंद्रित होण्यात काहीच अर्थ नाही असं पक्षाला वाटू लागलं आहे, की प्रशांत किशोर यांनी तसा भविष्यातील सल्ला केजरीवालांना दिला आहे असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे.
‘मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हनुमानजींचा आर्शीवाद मिळाला. आता दिल्लीतील शाळा, मदरशांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हनुमान चालीस सक्तीची करा’, असं ट्विट करत भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र ‘आप’ने भाजप नेत्याची म्हणणं गंभीरतेने घेतल्याचं दिसतंय. ‘आप’चे आमदार सौरभ भारद्वाज यांनी एक निमंत्रण छापलंय. दर मंगळवारी आपल्या विधानसभा मतदारसंघात सुंदरकांडची कथा दाखवण्याची घोषणा त्यांनी केलीय. यामुळे ‘आप’ची वाटचाल हिंदुत्वाकडे सुरू असल्याचं बोललं जातंय.
हर महीने के पहले मंगलवार को सुन्दर कांड का पाठ अलग अलग इलाकों में किया जाएगा।
निमंत्रण- सुन्दर काण्ड
शाम 4:30 बजे
18 फरवरी, मंगलवार
प्राचीन शिव मंदिर, चिराग दिल्ली(निकट चिराग दिल्ली मेट्रो स्टेशन गेट नo1) pic.twitter.com/CwGAXzAW5r
— Saurabh Bharadwaj (@Saurabh_MLAgk) February 18, 2020
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ‘आप’ आता राष्ट्रीय पातळीवरील राजकीय लढाईची तयारी करतेय. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची स्थिती अतिशय वाईट आहे. अशात ‘आप’ राष्ट्रीय स्तरावर कंबर कसून उतरण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय स्तरावर ‘आप’चा सामना भाजपशी आहे. आणि भाजपचा सामना करायचा असेल तर हिंदुत्वापासून दूर राहता येणार नाही, हे ‘आप’ने ओळखलंय.
गुजरात आणि मध्य प्रदेशातील निवडणुकीवेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंदिरांना भेटी दिल्या. काँग्रेसने मवाळ हिंदुत्वाचे धोरण स्वीकारले होते. त्यावेळी भाजपने काँग्रेसचे हिंदुत्व बेगडी असल्याचा आरोप केला. आता ‘आप’ कट्टर हिंदुत्वाच्या आजेंड्यावर पुढे जात असल्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे आगामी काळात भाजप समोर ‘आप’ चे आव्हान असेल.
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी देखील लोकसभा निवडणुकीपूर्वी सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारलं होतं. मात्र काँग्रेसची अल्पसंख्यांक धार्जिणी भूमिका देशात सर्वश्रुत आहे आणि CAA आणि NRC विरोधी आंदोलनातून ती अधोरेखित झाल्याने काँग्रेस पुन्हा अल्पसंख्यांकाचा पक्ष असल्याची देशभर भावना झाली आहे. इतर राज्यांमध्ये टिकायचे आणि हातपाय पसरायचे असतील तर दिल्लीतील विकासाचा पुरावा घेऊन हिंदुत्वाचा पुरस्कार केला जाईल अशी शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला बिहारमध्ये देखील प्रशांत किशोर वेगळीच भूमिका मांडत असून, मुंबई प्रमाणे संपूर्ण बिहार २४ तास खुलं असावं असं म्हटल्याने विकास, सुरक्षा आणि हिंदुत्व हे प्रमुख विषय असणार हे निश्चित आहे.
Web Title: Story why Delhi CM Arvind Kejriwal government is adopting Hindutva agenda.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS