16 April 2025 7:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

JNU हल्ला: बंगळुरू'मध्ये विद्यार्थ्यांकडून जोरदार निदर्शन

JNU Attack

नवी दिल्ली: जेएनयू विद्यापीठात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सध्या आंदोलन सुरू आहेत. त्या कॅम्पसमधील आंदोलनात अनेक सिलीब्रीटी व्यक्ती देखील सामील होतं आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आहेत. देशभरात अनेक ठिकाणी विद्यार्थी देखील या घटनेचा निषेध करताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात ३४ विद्यार्थी जखमी झाले असून, विद्यार्थी संघटनेची आईशी घोष ही जखमी झाली आहे. जेएनयूचा माजी विद्यार्थी कन्हैय्या कुमार या हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला आहे. कॅम्पसमध्ये आंदोलन सुरू असताना कन्हैय्या जय भीम जय भीमच्या घोषणा देत होता. त्याचवेळी दीपिका आंदोलनस्थळी दाखल झाली. दीपिकानं केवळ आईशीसोबत काही वेळ चर्चा केली आणि त्यानंतर ती निघून गेली. यावेळी तिनं मीडियाशी कोणत्याही प्रकारे संवाद साधला नाही.

दरम्यान, बंगळुरू येथे विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोठ्या प्रमाणावर या घटनेचा निषेध केला आणि गुन्हेगारांना धडा शिकविण्याची मागणी केली. तसेच देशात विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्था सुरक्षित नसल्याचं सांगत सरकारचा देखील निषेध केला आहे.

 

Web Title:  Students gathered and Protest at Bangalore over JNU Attack.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या