27 December 2024 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

कोवीशील्डचे दोन डोस घेतल्यानंतर कोरोनाची शक्यता 93% कमी होते | अभ्यासातून दावा

covishield

मुंबई, ०४ ऑगस्ट | लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत असल्याच्या वृत्तांमुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातही प्रामुख्याने एस्ट्राजेनेकाच्या कोवीशील्डबद्दल विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण, देशातील सशस्त्र दलांच्या 15 लाख 90 हजार पेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सवर झालेल्या अभ्यासात दिलासादायक बाब समोर आली आहे. या सर्वांना कोवीशील्डचे दोन्ही डोस देण्यात आले होते. त्यांच्यातील ब्रेक-थ्रू इन्फेक्शन 93% कमी झाल्याचे दिसून आले आहे. याचा अर्थ असा की कोवीशील्ड लस घेणाऱ्यांना कोरोनाचा धोका 93% कमी झाला आहे.

ब्रेक-थ्रू इन्फेक्शनवर झालेल्या देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अभ्यासानुसार, देशात व्हॅक्सीनेशन झाल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण केवळ 1.6% आहे. म्हणजेच, दोन्ही डोस घेतलेल्या 1000 लोकांपैकी केवळ 16 जणांना कोरोनाची लागण होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने दोन्ही डोस घेऊन दोन आठवडे झाल्यानंतरच त्याला पूर्णपणे व्हॅक्सीनेटेड असे म्हटले जाते. त्यांच्यावरच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ब्रेक थ्रू इन्फेक्शनच्या प्रमाणावर चंदिगडच्या पीजीआय येथे आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज (AFMC) ने अभ्यास केला आहे. या अभ्यासाला विन-विन कोहोर्ट असे नाव दिले. तसेच हे जर्नल ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.

नीति आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी अभ्यासावर बोलताना सांगितले, की “हा अभ्यास 15 लाखांपेक्षा अधिक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्कर्सवर करण्यात आला आहे. ज्यांनी कोवीशील्डचे दोन डोस घेतले त्यातील 93% लोकांना कोरोनाच्या विरोधात संरक्षण मिळाले आहे. त्यातही महत्वाचे म्हणजे, कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा उद्रेक सुरू असतानाच हा अभ्यास करण्यात आला.

व्हॅक्सीनचे सिंगल डोस 82% प्रभावी:
याच महिन्याच्या सुरुवातीला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तामिळनाडू पोलिस विभाग, ICMR-नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर यांच्यामार्फत करण्यात आलेला अभ्यासाची माहिती जारी केली. त्यानुसार, लसीचा सिंगल डोस घेतल्यास तो कोरोनावर 82% पर्यंत प्रभावी ठरू शकतो. दोन्ही डोस घेतल्यास कोरोनापासून 95% संरक्षण मिळते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Study says the effectiveness of Covishield vaccine gives 93 percent protection from Corona news updates.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x