20 April 2025 8:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीमुळे राम मंदिर देखील भाजपला वाचवू शकणार नाही: खा. सुब्रमण्यम स्वामी

PM Narendra Modi, bjp mp subramanian swamy

नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार हे नेहमीच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जोरदार टीका करत आले आहेत. तसेच सध्या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असताना त्यालाच अनुसरून सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. अर्थव्यवस्थेला रुळावर आणता आले नाही, तर राम मंदिराचा विजयही पक्षाला तारू शकणार नाही, तसेच अर्थव्यवस्थेला योग्य मार्गावर आणण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. ‘हफपोस्ट इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सुब्रमण्यम स्वामींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

दरम्यान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर निशाणा साधत ते म्हणाले, याचा फायदा दिसत नाही. यावर त्यांचा थेट रोख हा परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीच्या विषयावरून होता. दरम्यान, झारखंडमध्ये सरयू राय यांच्यावर कारवाई करण्यात आली, खरं तर प्रामाणिकपणा पाहता त्यांचा सन्मान करण्याची गरज आहे. अयोध्या निर्णयाचा लाभ भारतीय जनता पक्षाला वाईट अर्थव्यवस्थेमुळे मिळणार आहे?, राम मंदिर बनणार असल्यानं मिठाई वाटप केलं जात आहे. त्यासाठी रॅलींचं आयोजनही केलं जात आहे. एक व्यक्ती स्वतःच्या मुलीची फीसुद्धा भरू शकत नाही. चांगल्या धोरणांनी वाईट परिस्थिती बदलता येऊ शकते.

मध्यंतरी देशात सीबीआय आणि सरकार दरम्यान मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं होतं. त्यावेळी देखील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला सूचक इशारा दिला होता. CBIचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यामधील वाद टोकाला गेल्यामुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप केला होता. या दोन्ही अधिकाऱ्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर धाडण्यात आले होते आणि CBI कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या होत्या. परंतु, मोदी सरकारच्या या कारवाईवर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

त्यावेळी संताप व्यक्त करताना CBI नंतर पुढचा नंबर ईडी’चा असेल, असं भाकीत सुद्धा स्वामींनी वर्तविल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सीबीआयनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांवर अशीच कारवाई सुरु झाल्यास भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच संपेल, असं सुब्रमण्यम स्वामींनी मत व्यक्त केलं होतं.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या