15 January 2025 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

तामिळनाडूच्या निवडणुकीत सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन एकत्र येण्याची शक्यता

Kamal Haasan, Super Star Rajanikanth

चेन्नई: २०२१ मध्ये तामिळनाडू मध्ये विधानसभा होणार असल्याने सध्या राज्यात निरनिराळ्या आघाड्यांची चर्चा रंगली आहे. त्यातच तब्बल ४० वर्षाची मैत्री असणारे दोन सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन (South Super Star Rajinikanth and Kamal Haasan) राजकारणात आले असून तीच मैत्री राजकारणात देखील प्रत्यक्ष पाहायला मिळू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्ष देखील दक्षिणेत प्रवेशाचे जोरदार प्रयत्न करत असून, त्यानिमित्ताने मध्यंतरी रजनीकांत यांना जवळ करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसला.

करुणानिधी आणि जयललिता (karunanidhi and jaylalitha Passes Away) यांच्या मृत्यनंतर भाजपाची राजकीय इच्छाशेती अधिक बळावल्याने पाहायला मिळाले. त्यात मध्यंतरी रजनीकांत यांचा भगव्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याबद्दल स्वतः रजनीकांत यांनी देखील खंत व्यक्त केली होती आणि त्यानंतर भाजपचे इरादे त्यांना लक्षात येऊ लागले होते. मात्र आता तामिळनाडूच्या राजकाणातील मोठी पोकळी भरून काढण्यासाठी स्वतः रजनीकांत आणि कमल हसन हे दोन सुपरस्टार एकत्र येणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

तामिळनाडूच्या राजकारणामध्ये (Tamil Nadu Politics) अशा प्रकारची निर्णायक सत्ता बघायला मिळू शकते का याविषयी ओडिशाकडून मानद डॉक्टरेट मिळवल्यानंतर कमल हासन आपल्या घरी जात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले: “तमिळनाडूच्या विकासासाठी गरज भासल्यास रजनीकांत आणि मी एकत्र येऊ शकतो. आता आमच्यासाठी विकास महत्वाचा आहे. आम्ही आमच्या धोरणांबद्दल नंतर बोलू शकतो आणि आम्ही मागील ४३ वर्षांपासून चांगले मित्र देखील आहोत असं ते म्हणाले.

दरम्यान, रजनीकांत यांनी गोव्याला जात असताना कमल हासन यांच्या प्रतिक्रियेला उत्तर दिले: “जर तमिळ लोकांच्या विकासासाठी अशी परिस्थिती निर्माण झाली, तर मी कमल हासन यांच्याशी हातमिळवणी करेन” असं म्हणाले आणि या नव्या आघाडीची चर्चा रंगली आहे.

हॅशटॅग्स

#Kamal Haasan(4)#Rajnikant(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x