लसींच्या दरांबाबत केंद्र सरकार काय करतंय?, ही राष्ट्रीय आणीबाणी नाही तर काय? - सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली, २७ एप्रिल | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची कमतरता आणि दुसऱ्या अडचणींविषयी सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी झाली. कोर्टाने केंद्राला विचारले की, संकटाचा सामना करण्यासाठी तुमचा नॅशनल प्लान काय आहे? लसीकरण हा प्रमुख पर्याय आहे का?
देशातील कोरोनाच्या हाहाकाराची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. कोरोना संकट रोखण्यासाठी तुमच्याकडे नॅशनल प्लान काय आहे? असा सवाल करतानाच व्हॅक्सीनचे वेगवेगळे दर आकारले जात आहे. त्यावर केंद्र सरकार काय करत आहे? सध्याची परिस्थिती ही राष्ट्रीय आणीबाणीच नाही काय? असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला केला आहे.
सुनावणीच्या सुरुवातीलाच सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की, आपल्याला लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे. जेव्हाही आम्हाला गरज वाटेल आम्ही दखल देऊ. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात मूकदर्शक बनून राहू शकत नाही. आम्हाला उच्च न्यायालयांना मदत करण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. या प्रकरणात त्या न्यायालयांनाही (एचसी) देखील महत्वाची भूमिका निभवायची आहे.
सुप्रीम कोर्टाचे केंद्राला 4 निर्देश
- SC ने केंद्राला विचारले – ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी केंद्राला सध्याची स्थिती स्पष्ट करावी लागेल. किती ऑक्सिजन आहे? राज्यांची गरज किती आहे? केंद्रातून राज्यांना ऑक्सिजन वाटपाचा आधार काय आहे? राज्यांना याची किती आवश्यकता आहे हे वेगाने जाणून घेण्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली आहे?
- गंभीर होत असलेल्या आरोग्याच्या गरजा वाढवल्या पाहिजे. कोवि़ड बेड्स वाढवा.
- अशी पावले सांगा जे रेमडेसिविर आणि फेवीप्रिविर सारख्या गरजेच्या औषधांची कमतरता पूर्ण करण्यासाठी उचलण्यात आले.
देशात कोरोनामुळे सक्रिय रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ आहे. यामुळे ऑक्सिजन, व्हेंटिलेअर, बेड्स आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत होता. याच पार्श्वभूमीवर सर्वाच्च न्यायालयाने स्वत: दखल घेत याबाबत केंद्र सरकाराकडून राष्ट्रीय आराखडा मागितला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकाराला काही दिवसांचा अवधी देत नोटीस बजावली होती.
या संबंधित प्रकरणावर न्यायमूर्ती एस. रवींद्र भट, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर यांचे तीन सदस्यीय खंडपीठ सुनावणी घेतील. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील आणि देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांना या प्रकरणात अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती दिली होती. परंतु, नंतर त्यांनी यामधून माघार घेतली होती. विशेष म्हणजे न्यायालयाने देखील यासाठी त्यांना परवानगी दिली.
News English Summary: The Supreme Court has taken cognizance of the corona crisis in the country. What National Plan Do You Have to Prevent the Corona Crisis? While asking this question, different rates of vaccine are being charged. What is the central government doing about it? Isn’t the current situation a national emergency? This question has also been asked by the Supreme Court to the Center.
News English Title: Supreme court asked to Modi government national plan on covid 19 crisis news LIVE Law news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल