कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत जर मुलांवर परिणाम झाला, तर केंद्र सरकारकडून कोणती तयारी? - सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली, ०६ मे : देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने गंभीर रूप धारण केलेलं असताना ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड्स आणि लस अशा सगळ्या आवश्यक घटकांची वानवा आहे. इतकी कठीण परिस्थिती असूनही,का ही ठिकाणी बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या थोडी तरी वाढू लागल्याने येत्या काही दिवसांत लाट ओसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र तरीही सुटकेचा निश्वास सोडण्यासारखी परिस्थिती अद्याप आलेली नाही. कारण लवकरच कोरोना संसर्गाची तिसरी लाटही येण्याचा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याबद्दल अनेक तज्ज्ञांमध्ये एकमत आहे मात्र ती केव्हा येणं अपेक्षित आहे, याबद्दल नेमका अंदाज बांधलेला नाही.
संपूर्ण देशातच कोरोनाने हाहाकार माजवला आहे. देशाच्या राजधानीलाही कोरोनाचा मोठा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात राजधानी दिल्लीतील ऑक्सिजन संकट आणि कोरोना स्थितीवर सुनावणी झाली. यावेळी, सुप्रीम कोर्टाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातही चिंता व्यक्त केली असून त्यासाठी आतापासूनच तयारी करण्यावर भर दिला आहे.
सुनावणीदरम्यान जस्टिस चंद्रचूड म्हणाले, जर उद्या परिस्थिती बिघडलीच आणि कोरोना रुग्ण वाढले तर, तर आपण काय कराल. रिपोर्ट्समध्ये म्हणण्यात आले आहे, की तिसऱ्या लाटेत मुलांवरही परिणाम होऊ शकतो. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, तिसऱ्या लाटेत काय करायला हवे, याची तयारी आताच करावी लागेल. तरुणांचे लसीकरण करावे लागेल. जर मुलांवर त्याचा परिणाम झाला, तर कसे सांभाळाल, कारण मुलं तर स्वतः रुग्णालयात जाऊ शकत नाही.
News English Summary: The third wave can affect children as well. The Supreme Court has said that what needs to be done in the third wave has to be prepared now. Young people need to be vaccinated. If it affects children, how will you take care of it, because children cannot go to the hospital on their own.
News English Title: Supreme court asked union govt about third wave of corona news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या