6 November 2024 2:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

अयोध्या प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट नकार

नवी दिल्ली: अयोध्या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. दरम्यान, राम मंदिर जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाची सुनावणीची तारीख जानेवारीत निश्चित करण्यात येईल, असं यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. परंतु, त्यानंतर सुनावणीनंतर लगेचच या प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, ही याचिका सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट पणे फेटाळून लावली आहे.

दरम्यान ही याचिका फेटाळल्यामुळे सत्ताधाऱ्यांची अडचण वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आणि शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा केला असून धार्मिक मुद्यांवरच लोकसभेला सामोरे जाण्याचा जणू चंगच बांधला आहे. दरम्यान, संबंधित याचिका ही अखिल भारत हिंदू महासभेनं दाखल केली होती. त्यामुळे हिंदुत्वादी संघटना मोदी सरकारवर अध्यादेश आणण्याचा दबाव आणू शकतात असं राजकीय विश्लेषकांनी मत व्यक्त केले आहे. आजच्या याचिकेवर बोलताना या प्रकरणात आपण आधीच आदेश दिलेले आहेत, असं म्हणत कोर्टाने महासभेची याचिका फेटाळून लावली.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x