20 February 2025 1:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक 42 टक्क्यांनी घसरू शकतो, तज्ज्ञांचा अलर्ट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA Trident Idea Share Price | ट्रायडंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TRIDENT IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा स्टॉक 52-वीक लो जवळ आला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर तेजीत, टॉप ब्रोकरेज बुलिश, मजबूत कमाईची होणार - NSE: TATAPOWER RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरमध्ये तुफान तेजी, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: RVNL EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, महिना 15,000 रुपये पगार असणाऱ्यांना इतकी पेन्शन मिळेल HDFC Mutual Fund | पैसे बँकेत ठेऊन वाढत नाहीत, अशा फंडात वाढतात, 1 लाख रुपयांवर मिळेल 1.74 कोटी रुपये परतावा
x

कोरोना लसींचा संपूर्ण हिशोब आणि संपूर्ण माहिती द्या | सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला आदेश

India corona pandemic

नवी दिल्ली, ०२ जून | कोरोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने देशातील नागरिकांचं लसीकरण सुरू केलं. पण लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम थांबली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून लसीकरणाची इत्थंभूत माहिती मागवली आहे.

लसींची खरेदी केव्हा केव्हा केली याचा संपूर्ण लेखाजोखा द्यावा, असे आदेश सर्वोच्य न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यासाठी कोर्टाने केंद्र सरकारला दोन आठवड्याची मुदत दिली आहे. लसीकरणाच्या पहिल्या तीन टप्प्यात दोन डोस घेणारे किती टक्के लोक आहेत, त्याची आकडेवारी द्या. तसेच शहरी भागातील किती लोकांचे लसीकरण झाले आणि ग्रामीण भागातील लोक लोकांचे लसीकरण झाले याचीही आकडेवारी द्या, असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, कोर्टाच्या निर्देशानुसार आता केंद्र सरकारला कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्पुतनिक व्ही या लसींची माहिती द्यावी लागणार आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात किती व्हॅक्सिनची ऑर्डर दिली. किती मिळाली, कोणत्या तारखेला मिळाली आणि कोणत्या व्हॅक्सिनची ऑर्डर दिली याची माहिती केंद्राला द्यावी लागणार आहे.

न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायाधीश एल. एन. राव आणि एस. रवींद्र भट्ट यांच्या विशेष खंडपीठानं आज दिलेल्या आदेशात म्हटलं की केंद्र सरकारनं आजवर खरेदी केलेल्या कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन आणि स्पुतनिक-व्ही लशींच्या खरेदीसाठी नेमक्या केव्हा ऑर्डर देण्यात आल्या? एकूण किती लस खरेदी करण्यात आल्या आणि त्यांचं वाटप कशापद्धतीनं करण्यात आलं? याची स्पष्ट माहिती कोर्टासमोर सादर करावी. याशिवाय, आतापर्यंत देशातील एकूण जनतेपैकी किती टक्के जनतेला लसीचा पहिला किंवा दुसरा डोस देण्यात आला आहे याचीही माहिती सादर करावी. यात ग्रामीण आणि शहरी भागातील प्रमाण किती? याचीही माहिती सरकारनं द्यावी असं कोर्टानं नमूद केलं आहे.

 

News English Summary: To prevent corona, the central government started vaccinating the citizens of the country. But the vaccination campaign has stalled due to a shortage of vaccines. Therefore, the Supreme Court has sought information on vaccination from the Central Government.

News English Title: Supreme Court pulls up Centre on vaccines asked if policy is to make states compete news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x