5 February 2025 5:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: APOLLO HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259
x

राज्यातील सुमारे ८२.२ टक्के शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना विरोध - सर्वेक्षण

Survey, Maharashtra, farmers opposed, Agricultural Laws

मुंबई, ०६ मार्च: तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर पुकारलेल्या आंदोलनास शनिवारी १०० दिवस पूर्ण झाले असून, यानिमित्त शेतकऱ्यांनी हरयाणातील कुंडली-मनेसर-पलवल (केएमपी) एक्स्प्रेसवेवर अनेक ठिकाणी रास्ता रोको केला.

याच विषयाला अनुसरून काल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देखील सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विट केले की, शेतकऱ्यांच्या संघर्षाचे, हक्काच्या लढाईचे १०० दिवस पूर्ण. अन्नदात्याच्या सन्मानाचे, गांधीजी, सरदार पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, शहीद भगतसिंग यांनी दाखवून दिलेल्या मार्गाचे शंभर दिवस पूर्ण. दुसरीकडे या कायद्याला केवळ पंजाब, हरियाणा आणि युपीच्या ठरविक पट्ट्यात विरोध आहे असं सत्ताधारी नेते सांगत असताना भाजपसाठी एक चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे.

दरम्यान, मागील वर्षी केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना राज्यातील सुमारे ८२.२ टक्के शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा निष्कर्ष या संदर्भातील एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. ‘किसान आझादी आंदोलन’ या संघटनेच्या वतीने कृषी कायदे व किमान हमी भाव या विषयांवर १६ जानेवारीपासून शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची या कायदेसंदर्भात काय भूमिका आहे याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि त्याचं मत देखील समजून घेण्यात आलं. यात राज्यातील ३४ जिल्ह्यातील एकूण १६१४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. (Survey says in Maharashtra 82 percent farmers oppose Agricultural Laws)

संबंधित सर्वेक्षणात सुमारे ८९.३ टक्के शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांबद्दल आपले मत व्यक्त केले. कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत का? या प्रश्नावर ८२.२ टक्के शेतकऱ्यांनी कृषी कायदे शेतकरी हिताचे नाही असेच उत्तर दिले आहे. या सर्वेक्षणात ९४ टक्के शेतकऱ्यांनी स्वामीनाथन आयोग लागू करावा, असे मत व्यक्त केले आहे. ८२.६ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळतो असे सांगितले आहे, तर ७.५ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला सरकारने घोषित केलेला हमी भाव मिळतो, असे मत नोंदविले आहे.

 

News English Summary: A survey in this regard has revealed that about 82.2 per cent farmers in the state are opposed to the three agricultural laws implemented by the central government last year. Kisan Azadi Andolan has been conducting a survey of farmers since January 16 on agricultural laws and minimum guaranteed prices.

News English Title: Survey says in Maharashtra 82 percent farmers oppose Agricultural Laws news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x