22 January 2025 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

सुशांत आत्महत्या प्रकरण | अखेर मुंबई पोलीस आयुक्तांचं 'ते' विधान सत्य ठरलं

Sushant Singh Rajput suicide, AIIMS, Central Bureau of Investigation, CBI

मुंबई, ३ ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांपेक्षा वेगळा नसेल. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण प्रोफेशनल पद्धतीने करण्यात आला आहे, असा दावा मुंबईचे पोलील आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. ते ‘महाराष्ट्राची शान’ या ‘झी २४ तास’च्या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

कोरोना संकटात जीवावर उदार होऊन लोकांचं रक्षण करणाऱ्या कोरोना योद्धा पोलिसांचा विशेष सन्मान ‘झी २४ तास’च्यावतीने करण्यात आला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल आणि मुंबई आयुक्त परमबीर सिंग उपस्थितीत होते.

 

News English Summary: AIIMS, in its report to the Central Bureau of Investigation (CBI), ruled out the theories of poisoning and strangling floated by Sushant Singh Rajput’s family and lawyer. The CBI will now be probing into the original charge of ‘abetment to suicide’ that was listed by the Bihar police. According to a report in a news portal, AIIMS Panel has completed the examination and closed the file after giving conclusive medico-legal opinion in this case and the CBI is corroborating the report with their investigation.

News English Title: Sushant Singh Rajput suicide AIIMS in its report to the Central Bureau of Investigation Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x