22 February 2025 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

डिजिटल शालेय शिक्षण, प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल - केंद्रीय अर्थमंत्री

Corona Crisis, Swayam Prabha DTH

नवी दिल्ली, १७ मे : आज लॉकडाऊन ३ चा शेवटचा दिवस आहे, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजसंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सविस्तर माहिती देत आहेत, त्यासाठी आज शेवटची पत्रकार परिषद झाली. याआधी ४ टप्प्यांमध्ये विविध क्षेत्रांसाठी अर्थमंत्र्यांकडून दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत. रविवारी ही पत्रकार परिषद सकाळी ११ वाजता सुरू झाली. आजच्या पाचव्या पत्रकार परिषदेमध्ये गुंतवणूक सेक्टर, ट्रेडिंग या क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता होती. ‘आत्मनिर्भर भारत बनवण्याची गरज आहे’, असं वक्तव्य यावेळी अर्थमंत्र्यानी केले.

दरम्यान देशावर आलेलं कोरोनाचं हे एक संकट आणि आव्हान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी संधी आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं. रविवारी (१७ मे) सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेतली असून यामध्ये पंतप्रधान मोदींनी घोषित केलेल्या पॅकेजचा अखेरचा टप्पा घोषित करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील उपाय योजनाबद्दल यामध्ये महिती देण्यात आली असून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मल्टीमोड अ‍ॅक्सेस डिजिटल/ऑनलाईनच्या माध्यमातून पंतप्रधान ई विद्या योजनेची सुरुवात केली जाणार आहे. तसेच या अंतर्गत अनेक कोर्स, शैक्षणिक चॅनल, कम्युनिटी रेडिओ, ई कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत.

चॅनलद्वारे ई-कॉन्टेंटची निर्मितीही होईल. वन क्लास, वन चॅनल या योजनेद्वारे १२ वीपर्यंतच्या विद्यार्थांसाठी चॅनेल तयार केले जातील. पॉडकॉस्ट, कम्युनिटी रेडिओ या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी मनोबल प्रोग्रामही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच दिव्यांगासाठी विशेष शिक्षा सामग्री तयार करण्यात येईल. देशातील टॉप १०० विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.

 

News English Summary: It provides information on education measures and important announcements. The Prime Minister’s e-Vidya Yojana will be launched through Multimode Access Digital / Online. Also, many courses, educational channels, community radio, e-courses will be started under this.

News English Title: Swayam Prabha Dth Channels Launched To Support And Reach Those Who Do Not Have Access To The Internet News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x