16 April 2025 5:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

VIDEO | 11 तासानंतर समुद्राच्या जीवघेण्या लाटांमधून सुटका, ONGC कामगार ढसाढसा रडला

Tauktae Cyclone

मुंबई, १९ मे | प्रचंड वेगाने वाहणारे वारे. खळवलेल्या समुद्र आणि ६ ते ८ मीटर उंचीच्या जीवघेण्या लाटा. अगदी मृत्यूच चाल करून येतोय असं वाटावं. तौते चक्रीवादळ मुंबईपासून जात असताना अरबी समुद्रात हे दृश्य होतं, ‘बॉम्बे हाय’ परिसरातील. तराफ्यांवर असलेल्या लोकांना एकाच वेळी मृत्यूने चौहीबाजूंनी जणू वेढाच दिला होता. त्यात तराफाच भरकटला आणि बुडायला लागला. तराफ्यावरील लोकांच्या पायाखालून जमीनच सरकरली. पण तरीही धीर न सोडता त्यांनी तब्बल ११ तास संकटाशी लढा दिला आणि सुखरूप बाहेरही पडले. पी-३०५ तराफ्यावरील कर्मचारी किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांचा अश्रूंचा बांध फुटला.

तौत्के चक्रीवादळामुळे बुडालेल्या ‘बार्ज पी- 305’वरुन कर्मचाऱ्यांची थरारक सुटका करण्यात आली. भारतीय नौदलाच्या आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्धनौका, तसंच ग्रेटशिप अहिल्या आणि ओशन एनर्जी या जहाजांच्या सहाय्याने समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. 17 तारखेलाच रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं होतं.

ANI’ने एका कामगाराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये हा कामगार रडताना दिसत आहे. ”नौदलाच्या जवानांचे खूप खूप धन्यवाद! त्यांच्यामुळे आम्ही आज जिवंत आहोत. नाहीतर कोणीही वाचले नसते. आमच्यासारखीच इतरांची स्थिती आहे.”, असे तो म्हणत होता.

 

News English Summary: ANI ‘posted a video of a worker. It shows the worker crying. “Thank you very much Navy personnel! Because of them we are alive today. Otherwise no one would have survived. Others are in the same situation as us, “he said.

News English Title: Tauktae Cyclone crew member of Barge P305 has been rescued by INS Kochi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या