5 November 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY
x

निवडणूक रणनीती चाणक्य प्रशांत किशोर दिल्लीत आम आदमी पार्टी'साठी रणनीती आखणार

Prashant Kishore, CM Arvind Kejariwal

नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करून सांगितले की, प्रशांत किशोर यांची कंपनी आयपॅक दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासोबत काम करणार आहे. दरम्यान, आज बिहारमध्ये प्रशांत किशोर आणि मुख्यमंत्री नीतिश कुमार यांची भेट होणार आहे. नागरिकत्व संशोधन कायद्याबाबत वेगळं मत असल्याने जेडीयूमध्ये प्रशांत किशोर यांना विरोध होत आहे.

इंडियन पॉलिटीकल एक्शन कमिटी औपचारीकरित्या राजकीय पक्षांचा प्रचार करते. त्यामुळे अर्थात दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर आम आदमी पक्षाचा प्रचार करताना दिसणार आहेत. तसेच किशोर हे जनता दल युनाईटेडचे उपाध्यक्ष देखील आहे. त्यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांचा प्रचार केला होता. ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. तर २०१७ मध्ये त्यांनी अमरिंदर सिंग यांचाही प्रचार केला. ते देखील सत्तेत आले.

तत्पूर्वी, प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रात शिवसेनेसाठी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काम केल्याचं सर्वश्रुत आहे. त्यावेळी आदित्य संवाद आणि शिवआशीर्वाद संकल्पना देखील प्रशांत किशोर यांच्या टीमने सुचवलं होतं आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांना राज्याच्या ग्रामीण भागात पोहोचविण्यात आलं. तसेच आंध्र प्रदेशमध्ये वायएस जगमोहन रेड्डी यांच्यासाठी देखील त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली होती आणि आज त्यांची देखील आंध्रप्रदेशात एकहाती सत्ता आहे.

२०१२ मध्ये पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली होती. तेव्हापासून ते राजकीय चाणक्या म्हणून ओळखले जातात. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि ममतादीदी गेले काही वर्षे देशातील राजकारणात मागे पडल्याचे चित्र आहे. तृणमूलमधील अनेक खासदार आणि आमदारांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल पक्षाचा ‘मेकओव्हर’ करण्यासाठी आणि ब्रँड ममता तयार करण्यासाठी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर याची मदत घेतली जाणार आहे.

हॅशटॅग्स

#Arvind Kejariwal(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x