भाजपच्या रॅलीमध्ये ७२ हजार LED स्क्रीन्स, तब्बल १४४ कोटी खर्च, असा दिला हिशेब
नवी दिल्ली, ८ जून : लॉकडाऊनसारखा उपाय योजल्यानंतरही देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विरोधकांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाशी लढण्यात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील. पण विरोधकांनी सांगावे, त्यांनी काय केलंय ते, असे आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिले आहे.
यावेळी अमित शाह म्हणाले की, काँग्रेसने भ्रष्टाचार आणि लांगूलचालनाचे राजकारण केले. मात्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी आपले सरकार हे गरीब, आदिवासी आणि दलितांचे सरकार असेल, असे सांगितले होते. मोदी जे बोलतात, ते करून दाखवतात. दरम्यान, मोदींनी साठ कोटींहून अधिक गरिबांचे जीवनमान उंचवावे यासाठी खूप मोठे काम केले. तसेच रामजन्मभूमीचा प्रश्न मोदी सरकारने न्यायालयात अचूक बाजू मांडल्याने सुटल्याचा दावाही अमित शाह यांनी केला.
दरम्यान, देशावर करोनाचं संकट ओढवलं आहे. तर दुसरीकडे काही राज्यातील विधानसभा निवडणुकाही जवळ येऊ लागल्या आहेत. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हर्च्युअल रॅलीतून प्रचाराचा बिगुल फुंकला. आउटलूकनं सूत्रांच्या माहितीवरून दिलेल्या वृत्तानुसार शाह यांच्या या व्हर्च्युअल रॅलीसाठी भाजपानं तब्बल १०,००० मोठ्या एलईडी स्क्रीन बसवल्या होत्या. तर संपूर्ण राज्यात ५०,००० अधिक स्मार्ट टिव्हींची व्यवस्था करण्यात आली होती.
भाजपाच्या पहिल्या व्हर्च्युअल रॅलीवर झालेल्या खर्चावरून राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मोठा आरोप केला आहे. “प्रसारासाठी एका एलइडीचा खर्च सरासरी २०,००० इतका आहे. रॅलीमध्ये ७२ हजार एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या होत्या म्हणजे तब्बल १४४ कोटी रूपये फक्त एलईडी स्क्रीनवर खर्च करण्यात आले. श्रमिक एक्स्प्रेसच्या भाड्यापोटी झालेले ६०० कोटी देण्यासाठी ना सरकार समोर आलं, ना भाजपा. यांची प्राथमिकता गरीब नाही, तर निवडणूक आहे,” असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.
प्रचार के लिए एक LED स्क्रीन पर औसत ख़र्च 20,000₹. BJP की आज की रैली में 72 हज़ार LED स्क्रीन लगाए गये है मतलब 144 करोड़ सिर्फ़ LED स्क्रीन पर खर्च किए जा रहे है।
श्रमिक एक्सप्रेस का किराया 600₹ था वो देने ना सरकार आगे आयी और न ही BJP।
इनकी प्राथमिकता गरीब नहीं बल्कि चुनाव है https://t.co/Zc9TIrCx6E
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) June 7, 2020
News English Summary: RJD leader Tejaswi Yadav has made a big allegation about the expenses incurred on the first virtual rally of BJP. “The average cost of an LED for transmission is Rs 20,000. A total of 72,000 LED screens were installed at the rally, meaning that Rs 144 crore was spent on LED screens alone.
News English Title: Tejasvi Yadav Says Bjp Spend 144 Crore On Led Screen For Shah Rally News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC