15 January 2025 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

जम्मू: CRPF जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद

Terrorist attack, CRPF, police party, Kashmirs Sopore

श्रीनगर, १ जुलै : जम्मू- काश्मीरमधील सोपोर येथे गस्त घालणाऱ्या CRPF जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफच्या सूत्रांचा हवाला देत एएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सोपोरमध्ये निगराणी करणाऱ्या सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांकडून जवानांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या या हल्लयामध्ये सध्या हाती आलेल्या माहितीनुसार ४ सीआरपीएफ जवान आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाल्याचं कळत आहे. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांपैकी दोन जवानांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं होतं. ज्यानंतर आता या हल्ल्यात एका जवानाचा आणि स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

सीआरपीएफच्या पथकावर हल्ला होताच सुरक्षा दलाची एक अतिरिक्त तुकडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला. सध्या सुरक्षा दलांचं ऑपरेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमधील दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. सीमेपलीकडून वारंवार घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तानकडून अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे.

 

News English Summary: Terrorists have attacked a detachment of CRPF personnel patrolling at Sopore in Jammu and Kashmir. The news was published by ANI citing CRPF sources.

News English Title: Terrorist attack on CRPF police party in Kashmirs Sopore one soldier martyred News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IndianArmy(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x