21 February 2025 3:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

CRPF च्या जवानांवर दहशतवादी हल्ला, ५ जवान शहीद; मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईक करणार का?

Narendra Modi, Amit Shah

जम्मू काश्मीरः जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. अनंतनाग येथील केपी रोडवर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात एकूण ५ जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार , अनंतनाग येथील केपी रोडवर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. परंतु, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे एकूण ५ जवान शहीद झाले. दरम्यान तसेच, याठिकाणी जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे.

दरम्यान, मागील ४ दिवसांपूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम शाहबाग लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुरक्षा दलांनी १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दरम्यान सध्या कोणत्याही निवडणुका नसल्याने मोदी सरकार कोणताही एअर स्ट्राईक किंवा सर्जिकल स्ट्राईक करणार नाहीत अशी बोचरी टीका समाज माध्यमांवर करण्यात येते आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x