23 December 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024
x

भाजप जिंकलं तिथेच सर्वाधिक गोंधळ | जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव - ममता बॅनर्जी

West Bengal assembly election 2021

कोलकत्ता, ५ मे | राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाष्य केलं आहे. आज सकाळीच त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या.

प. बंगालच्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्यावरुन भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं सुरु होतं. आता त्यावर ममता बॅनर्जी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

त्या संदर्भात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटना सहन केल्या जाणार नाही. जिथे भारतीय जनता पक्ष जिंकलं आहे, तिथे याहूनही अधिक गोंधळ माजलेला आहे. भारतीय जनता पक्ष जुने व्हिडिओ दाखवून या घटनांचा बनाव करत आहे. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की त्यांनी असे प्रकार थांबवावेत. तुम्ही सर्वांनी निवडणुकीच्या दरम्यान बरंच काही केलं आहे. बंगाल ही एकता असलेली भूमी आहे”.

 

News English Summary: In that context, Mamata Banerjee said, “Incidents of such violence will not be tolerated. Where the Bharatiya Janata Party has won, there is even more confusion. The Bharatiya Janata Party is fabricating these incidents by showing old videos. I urge all political parties to stop this. You have all done a lot during the election. Bengal is a land of unity ”.

News English Title: The Bharatiya Janata Party is fabricating these incidents by showing old videos news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x