20 April 2025 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

सुधारणा नको, कायदेच रद्द करा | शेतकऱ्यांच्या ठाम भूमिकेमुळे केंद्राचे धाबे दणाणले

Modi government, Farm Bills, New Agriculture Law, Farmers Protesting

नवी दिल्ली, ३ डिसेंबर: दिल्लीतील कृषि कायद्याविरुद्धचा शेतकऱ्यांचा लढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शेतकऱ्यांच्या चिकाटी आणि जिद्दीपुढे केंद्र सरकार पूणर्पणे थकल्यासारखं वागत आहे. बैठकांचा सपाटा सुरु झाला असला तरी केंद्राच्या पळवाटांवर शेतकरी विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचं दिसतं आहे.

दरम्यान, विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांमध्ये झालेली बैठक आज देखील निष्फळ ठरली आहे. दिवसभर चाललेल्या चर्चेत गाडी फार पुढे जावू शकली नाही. केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर तर शेतकरी संघटना या त्यांच्या भूमिकेवर ठाम होत्या त्यामुळे तोडगा निघू शकला नाही. आता पुढची चर्चा ही थेट 5 डिसेंबरला होणार आहे. नवे कायदे रद्द करा (Farm Law 2020)अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तर त्यावर माघार घ्यायला मोदी सरकारची अजिबात तयारी नाही. MSPची तरतूद ही कायद्याने व्हावी अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. शेतकरी आंदोलनाचा 8वा दिवस असून मोदी सरकारची चिंता वाढली आहे.

दिल्लीतल्या विज्ञान भवनात 35 शेतकरी संघटना आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये ही चर्चा झाली. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पीयुष गोयल यांनी शंकांना उत्तरं दिलीत. दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्र सरकार आणि ४० शेतकरी नेत्यांमध्ये गुरुवारी झालेली बैठकही निष्फळ ठरली आहे. केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र स्वरुप धारण करत आहे. यापार्श्वभूमीवर कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासोबत सात तास चाललेली बैठक यशस्वी होऊ शकली नाही. या बैठकीत शेतकरी नेते कृषी कायद्यांमध्ये सुधारणा नको तर कायदेच रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम राहिले.

 

News English Summary: We are hopeful. The laws are wrong. In the next meeting, we will put pressure on the government. They will have to say that they will take back the laws. In my opinion, it will be finalized in the meeting day after tomorrow said Harjinder Singh Tanda, Azaad Kisan Sangharsh Committee.

News English Title: The meeting with the Modi government and farmers is fails due to strong stand of farmers News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या