22 November 2024 12:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून मोदी सरकार नफेखोरी करत आहे - राहुल गांधी

Modi government, Petrol and diesel, Rahul Gandhi

नवी दिल्ली, 29 जून : पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढवून मोदी सरकार नफेखोरी करत आहे. असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच एक्साइजचे दर कमी करा आणि इंधनाचे दर नियंत्रणात आणा असंही त्यांनी म्हटलं आहे. आपला एक व्हिडीओ ट्विट करुन त्यांनी ही मागणी केली आहे. करोना, बेरोजगारी, आर्थिक संकट यांनी आ वासलेला आहेच. या तीन संकटांमुळे सगळ्याच लोकांना फटका बसला आहे. गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, मजूर, शेतकरी या सगळ्यांनाच या तीन गोष्टींमुळे नुकसान झालं आहे. मात्र सर्वाधिक फटका बसला आहे तो मजूर, मध्यमवर्गीय, खासगी नोकरदार, शेतकरी यांना. मोदी सरकारने त्यांचा विचार केला नाही असंही त्यांनी म्हटलंय.

राज्यात आज काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर निर्दशन करून मोदी सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान पेट्रोल-डिझेल दरवाढीला राज्य सरकार जबाबदार आहे, दावाच विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. प्रवीण दरेकर सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीवरचे खापर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर फोडलं. ‘इंधन दरवाढीचा निर्णय हा पेट्रोल कंपन्या घेत असतात. राज्य सरकार जे कर लावते, त्यामुळे दरवाढ होत असते. भाववाढीचा नीट अभ्यास केला पाहिजे. राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेल दरवाढीतून राजकारण करत आहे.’ असा आरोपच दरेकर यांनी केला.

दुसरीकडे, काँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात जे आंदोलन सुरु केलं आहे ते बेगडी आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अमरावतीत त्यांनी रुग्णालयांना आणि क्वारंटाइन सेंटर्सना भेटी दिल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना काँग्रेसच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर त्यांनी काँग्रेसचं आंदोलन बेगडी असल्याचं म्हटलं आहे.

“पेट्रोल-डिझेलचे दर आता कंपन्यांच्या हाती आहेत. ते सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याचा निर्णय काँग्रेसच्या राजवटीतच झाला. इंधन हे जीएसटीच्या कक्षेत नसल्याने त्यावर व्हॅट आकारला जातो. २०१८ मध्ये अशीच वेळ आली होती, तेव्हा आपल्या सरकारने ५ रूपयाने दर कमी केला होता. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात १ रूपया आणि आता २ रूपये व्हॅट वाढविला. एकूण 3 रूपये राज्य सरकारने वाढवले आहेत त्यामुळे त्यामुळे काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधातील आंदोलन हे बेगडी आहे”.

 

News English Summary: The Modi government is making a profit by increasing the rates of petrol and diesel. This allegation has been made by Congress leader Rahul Gandhi. He also said that excise rates should be reduced and fuel prices should be brought under control.

News English Title: The Modi government is making a profit by increasing the rates of petrol and diesel says Rahul Gandhi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x