26 December 2024 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

चिंताजनक! २४ तासांत आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित

India, Covid 19

नवी दिल्ली, ४ जून: देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दररोज वाढत चालला आहे. दिवसेंदिवस या आकड्यात मोठी वाढ होत असल्याने सध्या परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. मागील २४ तासात देशात ९३०४ कोरोनाग्रस्त आढळून आले असून २६० जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीची माहीती दिली आहे.

देशभरात सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यात सध्या ७४८६० कोरोनाबाधित आहेत. यापैकी ३२ हजार ३२९ जणांनी कोरोनावर मात कली आहेत. तर २५८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राज्यस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. जगभरातील २१३ देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे.

जगभरात कोरोनाचे ६५.७३ लाख रुग्ण झाले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून १९ लाख रुग्ण आहेत. करोनाबाधित रुग्णसंख्येत भारत सातव्या स्थानी असून भारताच्या आधी अमेरिका, ब्राझील, रशिया, इंग्लंड, स्पेनचा क्रमांक आहे. चीन १४ व्या क्रमांकावर असून तुर्की, इराण आणि पेरु अनुक्रमे १०, ११ आणि १२ व्या क्रमांकावर आहेत.

 

News English Summary: The number of corona viruses in the country is increasing day by day. In the last 24 hours, 9304 coronaviruses have been detected in the country and 260 people have died. The Union Ministry of Health has released statistics on coronary heart disease in the country.

News English Title: The number of corona viruses in the country is increasing day by day News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x